(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
जीवनचक्रानुसार उंदराला सापाचे अन्न मानले जाते. आपल्या देशात साप आणि उंदीर जिथे तिथे पाहायला मिळतात. साप बऱ्याचदा शेतातील उंदरांचा नायनाट लावतो ज्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्याची पूजा केली जाते. साप हा मुळातच एक धोकादायक प्राणी आहे, त्याच्या चपळतेने आणि हुशारीने तो समोरच्याला क्षणार्धात मृत्यूच्या दारी पोहचवतो. अनेक साप विषारीही असतात , त्याच्या विषाने ते समोरच्यावर हल्ला चढवतात आणि एका झटक्यात त्याची शिकार करतात. सापाच्या हातही कोणी आलं तर त्याचे जिवंत बाहेर पडणे थोडे कठीणच असते मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काहीतरी भलतंच घडताना दिसून येत आहे. यातील दृश्ये तुम्हाला थक्क करतील.
सापाच्या एका शिकारीचे दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात साप एल उंदरावर हल्ला करताना दिसून येत आहे. मात्र यात सापाची चांगलीच फजिती झाल्याचे दिसून आले. साप फार चपळतेने मागून येऊन उंदरावर हल्ला करतो मात्र हा उंदीर जास्तीच शहाणा निघतो. सापाने हल्ला करताच उंदीर असा कुंफू फाईट सापाला मारतो की पाहून सर्वांनाच धक्का बसतो. यावेळी साप देखील आश्चर्यचकित झाल्याचे दिसून यते. त्याच्या या मजेदा फाईटचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. नक्की काय आहे या व्हिडिओत? चला जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक साप बिळात लपलेल्या उंदराची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र उंदीर देखील स्वरक्षणासाठी कराटे शिकून आलेला असतो. त्यामुळे उंदराने सर्वात आधी सापाच्या तोंडावर माती फेकून त्याला कनफ्युज केलं. मग साप मोठी झडप मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न करू लागला. पण उंदराने जॅकी चॅनसारखी उडी मारून उलट सापावरच प्रतिहल्ला केला. यानंतर सापही मागे हतला नाही तर त्याने पुन्हा उंदरावर हल्ला केला पण हा हल्ला सुद्धा निकामी ठरला. कारण यावेळी उंदराने ब्रूस लीसारख्या कीक मारून सापाला जखमी केलं. शेवटी सापाने उंदराच्या शिकारीचा विचार मनातून काढून टाकला आणि तो दुसरीकडे निघून गेला.
साप-उंदराच्या या फाईटचा व्हिडिओ @vikash_jaanii नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केला आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काय साप बनणार रे तू” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बिचारा साप”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.