(फोटो सौजन्य: X)
नक्की काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत रेल्वे ट्रॅकवरील एक दृष्य दिसून येते. रेल्वे रुळावर ट्रेन धावत असतो आणि याचवेळी खिडकीला एक व्यक्ती लटकत असतो. एका प्रवाशाने खिडकीतून त्याचा हात पकडलेला असतो ज्यामुळे खिडकीतून लटकतच त्याचा चालू रेल्वेत प्रवास सुरु असतो. व्हिडिओत प्रवासी लटकणाऱ्या व्यक्तीला मारताना देखील दिसतो.
मिळालेल्या माहितीनुसार, लटकलेला व्यक्ती हा एक चोर असतो. चोरीच्या उद्देशाने तो खिडकीत हात घालून एखादी वस्तू चोरण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा हा प्रयत्न सपशेल फेल ठरतो. प्रवासी त्याला चोरी करताना पकडतो आणि त्याचा हात खिडकीच्या आतून पकडून ठेवतो. काहीवेळाने ट्रेन सुरु होते पण चोराला अद्दल शिकवण्यासाठी प्रवासी त्याचा हात सोडत नाही ज्यामुळे चालू ट्रेनला लटकत त्याला प्रवास करावा लागतो. ही घटना सध्या चांगलीच चर्चेत असून व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
ट्रैन में mobile चोरी करना कभी कभी कितना भाड़ी
पर जाता है इस video क़ो देखकर अंदाजा लगा सकते है… आजकल ट्रैन में चोरी का ममला बहुत बढ़ गया है… खिड़की क़े पास बैठने वाले लोग क़ो सतर्क रहना चाहिये… pic.twitter.com/mLlqG7ZDx0 — Manish Yadav (@ManishY71326383) July 18, 2026
व्हिडिओ @ManishY71326383 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “जशी करणी तशी भरणी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ पाहून धक्का बसला, पण कोणालाही जीव धोक्यात घालणे योग्य नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “बरोबर केलंत, अशी शिक्षा पाहून पुन्हा चोरी करण्यापूर्वी दहा वेळा विचार करेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






