संत निवृत्तीनाथ महाराजांच्या माऊलींचा पालखी सोहळा करमाळ्यात; वारकऱ्यांसाठी विविध सोयीसुविधा
करमाळा : संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळा शनिवारी (दि.18) सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात दुपारच्या सुमारास आला. त्यानंतर रावगाव मुक्कामी होऊन दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.19) सकाळी करमाळा येथे आगमन झाले. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकऱ्यांसाठी सोयी असलेल्या व्यवस्था केली आहे. सोहळ्यासाठी जिल्ह्यातील रावगाव या ठिकाणी प्रशासनाने पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
रावगाव येथे शनिवारी दुपारी सोहळ्याचे स्वागत झाल्यानंतर सदरची पालखी करमाळा येथे आली. चालू वर्षी जिल्हा परिषद प्रशासनाने पालखी सोहळ्याकडे विशेष लक्ष दिले असून, सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी कार्तिकीयन यांनी देखील रावगाव या ठिकाणी संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन या पद्धतीने भव्य कमानी लावून पालखीचे स्वागत केले आहे. याशिवाय जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच प्रांत अधिकारी हे देखील पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी विशेष लक्ष देऊन आहे.
संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीच्या वारकऱ्यांना विविध सेवा सुविधा देण्यात आल्या असून, यामध्ये मोफत फूट मसाज, मोफत केस कर्तनालय मोफत कपड्यांना इस्त्री, याशिवाय अन्नदान व मोफत चपलांची दुरुस्ती अशा वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यात आल्याचे सांगितले आहे.
वारकऱ्यांना आरोग्याच्या सोयी सुविधा पालखी मार्गावरील वारकऱ्यांना, दिवसाच्या सोयीसाठी दवाखाने व पाणी व्यवस्था प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेतली आहे. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यासाठी रावगाव ग्रामस्थ तसेच करमाळा तहसील प्रशासन जिल्हा परिषद प्रशासन जोरदार तयारी करत असून, वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहिती करमाळा तहसील प्रशासनाने यावेळी बोलताना दिली
विद्युत रोषणाईने वेधले लक्ष
श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील रावगाव तालुका करमाळा येथे सायंकाळी चारच्या सुमारास आगमन झाले. त्या दृष्टीने ग्रामस्थांनी हिंदू-मुस्लिम एकोपा कायम अबाधित राहावा म्हणून ग्रामस्थांनी रावगाव गावातील मशिदीवर वेगवेगळ्या प्रकारच्या विद्युत रंगाची आकर्षण रोशनाई केली आहे.






