आजी आजोबा खरे आशीर्वाद! नातू हिटरला हात लावयला गेला इतक्या आजोबा आले अन्...; थरारक VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ असे व्हिडिओ पाहायला मिळतात. अनेकदा अंगावर काटा आणणारे अपघातांचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. याशिवाय, कुटूंबातील काही जिव्हाळ्याचे व्हिडिओ देखील अलीकडे सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सध्या असाच एक आजोबा आणि नातवाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, यामध्ये एका आजोबांनी आपल्या नातवाचा जीव वाचवला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर घरात आजी-आजोबा किंवा वडीलधारी मंडळी का असावीत, याचे महत्त्व प्रत्येकाला पटेल. आजी-आजोबांचे आशीर्वाद घरावर असल्याने घर अगदी समृद्ध राहते. लहान-मुलांवर चांगले संस्कार होतात. यामुळे याचे महत्त्व पटवून देणारा हा व्हिडिओ आहे.
नेमकं काय घडलं?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक छोटा चिमुकला खेळत असताना हळहळू एका पाण्याच्या बादलीकडे जात असतो. त्या बादलीत एक हिटर ठेवलेला असतो जो स्वीच बोर्डला जोडलेला असतो. या चिमुकल्याने त्या गरम बादलीला स्पर्श केल्यास त्याला धोका निर्माण होऊ शकतो, हे आजोबांच्या लक्षात येताच ते तत्काळ धावत येतात आणि चिमुकल्याला उचलतात. मात्र, चिमुकल्याला वाचवताना त्यांचा स्वतःचा तोल जातो आणि ते जमिनीवर कोसळतात. त्यांच्या पडण्याचा आवाज ऐकून चिमुकल्याचे आई-वडील तातडीने बाहेर येतात. चिमुकल्याच्या आईने लगेच त्याला उचलून घेतले, पण या घटनेमुळे आजोबांना चांगलाच राग आला आणि त्यांनी मुलाच्या आई-वडिलांना रागावत सल्ला दिला.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या व्हिडीओमधील आजोबांची तळमळ आणि काळजी पाहून कोणाच्याही डोळ्यांत अश्रू येतील. घरातील वडीलधारी मंडळी कुटुंबासाठी किती महत्त्वाची असतात, याचा अनुभव हा व्हिडीओ देतो. आजोबांनी त्वरित दाखवलेल्या प्रतिक्रियेमुळे चिमुकल्याचा जीव वाचला. मात्र, अशा अनेक घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @official_vishwa_96k या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडीओला “म्हणूनच घरात वडीलधारी मंडळी असावीत” असे कॅप्शन देण्यात आले आहेत. यावर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी आजोबांच्या तत्परतेचे कौतुक केले तर काहींनी पालकांच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे पालकांनी आपली जबाबदारी ओळखणे गरजेचे आहे. मुलं घरात असो किंवा बाहेर, त्यांच्यावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अशा प्रसंगांवरून आपण शिकावे आणि आपल्या वडीलधाऱ्यांचे महत्त्व ओळखून त्यांचा सन्मान करावा.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.