आपल्या देशात श्रद्धेला फार महत्त्व आहे. देशात अनेक देवी-देवतांचे मंदिर आहेत, जिथे रोज हजारो लोक जातात. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर बहुतेकदा तिथल्या दानपेटीत पैसे दान केले जातात. लोक आपल्याला जमतील तितके पैसे या दानपेटीत श्रद्धेच्या रूपात टाकतात. दानपेटीतील पैशांचा वापर हा गरजूंसाठी केला जातो असा अनेकांचा समज आहे मात्र खरोखर या पैशांचं काय होत ते आजवर कोणी पाहिले नसावे. पण आता यासंबंधीचा एक धक्कादायक प्रकार सध्या सोशल मीडियावर उघडकीस आला आहे.
प्रत्येक मंदिरात मंदिराच्या देखभालीसाठी आणि देवाची पूजा-अर्चना करण्यासाठी एक पुजारी ठेवला जातो. मंदिरातील पुजाऱ्यांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असते मात्र विचार करा या पुजाऱ्यांचे एक आगळे-वेगळे रूप तुमच्यासमोर आले तर तुम्ही काय कराल? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका प्रसिद्ध मंदिराच्या दानपेटीतील पैसे चोरण्याचा प्रकार समोर आला. विशेष म्हणजे, ही चोरी कोणत्या चोराने नव्हे तर चक्क मंदिरांच्या पुजाऱ्यांनीच केल्याचे उघड झाले. या धक्कादायक प्रकारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओत नक्की काय घडले? चला सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे प्रकरण?
सदर घटना ही बंगळुरूमधील अंजनेया स्वामी मंदिर या ठिकाणी घडली. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मंदिरातील दान पेटीत जमा झालेल्या पैशांच्या मोजणीचे काम सुरू आहे. दरम्यान एक व्यक्ती नोटांचे बंडल आपल्या खिशात ठेवतो आणि गुपचूप तेथून पळ काढतो. ही संपूर्ण घटना मंदिरात बसव्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. लोक आता या घटनेवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत
बेंगलुरु के एक मंदिर में कर्मचारियों द्वारा दान की गई राशि चुराने की एक हालिया क्लिप ने भक्तों में आक्रोश पैदा कर दिया है pic.twitter.com/gwVoKu0Juy
— 🍁Ashok Bauddha🍁 (@AshokBuaddha) December 19, 2024
.
एवढेच बघायचे बाकी होते! रीलसाठी चक्क श्वानाचे दूध पिऊ लागली तरुणी, किळसवाण्या प्रकारचा Video Viral
चोरीचा हा व्हिडिओ @AshokBuaddha नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘बेंगळुरूमधील एका मंदिरात कर्मचाऱ्यांनी दान केलेल्या निधीची चोरी केल्याची नुकतीच क्लिप समोर आल्याने भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेक युजर्स यावर भडकले असून आता लोक पुजाऱ्यावर रीतसर पोलीस कारवाई करण्याची मागणी करत आहेत. घटनेमुळे आता भाविकांमध्ये संतापाची लाट उसळून येत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.