सोशल मीडियावर जुगाड, स्टंट्स, डान्स असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे बऱ्याचदा काही अजब-गजब गोष्टी, जीवघेणे अपघात अशा घटनाही व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज अनेकदा अंगावर कटा आणतात. तसेच इथे काही मारामारीचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. सध्या अशाच एका जीवघेण्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात दोन तरुण रेल्वे स्थानकावर अक्षरशः एकमेकांना जीव जाईस्तोवर मारताना दिसून आले. व्हिडिओतील दृश्ये पाहून तुम्ही हैराण झाल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर रेल्वे आणि ट्रेन संबंधित अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. सध्या देखील असाच एक व्हिडिओ इथे नुकताच व्हायरल झाला आहे. यात दोन तरुण एकेमकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. माहितीनुसार, ही घटना मुंबईतील कांदिवली रेल्वे स्थानकावर रात्रीच्या सुमारास घडून आली. तरुणांमधील या जीवतोड हाणामारीचा तेथील एकाने व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्की यात काय घडले ते जाणून घेऊयात.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत जर आपण पाहिले तर यात रेल्वे प्लॅटफॉर्मवरील दृश्ये दिसून येत आहेत. रात्रीची वेळ असल्याकारणाने इथे फार प्रवाशांची गर्दी नाही, मात्र याच वेळी इथे काही तरुण प्रवासी एकमेकांना जोरदार हाणामारी करत असल्याचे आढळून येते. ते एकमेंकाना मिळेल ती वस्तू घेऊन मारत आहे. यातील एक तरुण स्थानकावरील कचऱ्याचा डब्बा दुसऱ्या तरुणाच्या डोक्यात मारताना देखील दिसून येतो.सर्व व्हिडिओ दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद करुन व्हायरल केला. दोन जण नाही चार पाचजणे मिळून एकमेकांना मारत आहेत. त्यांच्यातील या भांडणाचे मूळ कारण मात्र अद्याप समजले नाही.
मारामारीच्या हा व्हिडिओ @mumbai.hai.bhai_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेक युजर्सने पाहिले असून आता हा व्हिडिओ वेगाने शेअर देखील केला जात आहे. तरुणांमध्ये राग हा कुटून कुटून भरलेला असतो. अशात जरा काही झाले की ते एकमेकांवर तुटून पडतात, एकमेकांना मारू लागतात. मात्र असे करताना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. येत्या काळात. रेल्वे स्थानकावरील अनेक प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.