आधी ट्रकने चिरडलं नंतर केला अंदाधुंद गोळीबार; ३१ डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र', 12 जण ठार
अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्समध्ये नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणाऱ्या गर्दीत ट्रक घुसवत अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यात १२ जण ठार झाले असून ३० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे 3.15 च्या सुमारास नाइटलाइफ संस्कृतीसाठी प्रसिद्ध बोरबॉन स्ट्रीट आणि इबरव्हिलनजीक घडली. एफबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, स्थानिक पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचं म्हटलं आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, गर्दीत ट्रक घुसवल्यानंतर ट्रकमधून खाली उतरत चालकाने जमावावर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. घटनास्थळावरून प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावर दिसत आहेत आणि गोळीबाराचा आवाज ऐकू येत आहे. जखमी लोक रस्त्यावर किंचाळताना दिसत आहेत. यात अनेकांचा जागीच मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार न्यू ऑर्लिन्स पोलिसांनीही संशयितावर गोळीबार केला. घटनेनंतर जखमींना स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यातक आलं आहे.
Waking up on New Year’s Day to a mass killing on Bourbon Street smh.
THIS IS AMERICA pic.twitter.com/bQZDynONVk
— Virility (@financemose) January 1, 2025
अपघात आणि गोळीबाराच्या घटनेनंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून घटनास्थळी भीतीदायक वातावरण निर्माण झालं आहे. व्हिडिओ आणि फोटोंमध्ये या भागात पोलिसांच्या गाड्या, रुग्णवाहिका दिसत आहेत. स्थानिक अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि संशयिताला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
न्यू ऑर्लीन्स पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सद्यस्थितीत असे दिसून येते की एका वाहनाने नवीन वर्षांचं स्वागत करणाऱ्या लोकांच्या गटाला धडक दिली. जीवित आणि मालमत्तेचं नुकसान निश्चित केलं गेलं नाही आणि काही लोकांचा मृत्यू झाला आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जवळच्या बोर्बन स्ट्रीटवर हजारो लोक जमले होते. आपत्कालीन पथके घटनेचा तपास करत असल्याने पोलिसांनी लोकांना सध्या या भागात जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान संशयिताच्या अटकेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
फलटण भागातील रुग्णालयात नोकरीस असलेल्या एका तरुणाने कर्जबाजारातून स्वत:वर गोळी झाडून जीव देण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कात्रज घाटात हा प्रकार घडला आहे. दीपक राजू लकड (वय ४२) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कात्रज घाटात रात्री आकराच्या सुमारास लकड हे जखमी अवस्थेत पडले होते. त्यांना पाहणाऱ्या काही नागरिकांनी ससून रुग्णालयात दाखल केले. नंतर ही माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे धाव घेतली. मात्र, दीपक लकड याने कात्रज घाटात चोरट्यांनी अडविले. पैसे न दिल्याने चोरट्यांनी पिस्तुलातून गोळीबार केला अशी खोटी माहिती त्याने पोलिसांना दिली. तेव्हा पोलीस चक्रावून गेले. गांभीर्याने पोलिसांनी तपास सुरू केला.