पेरूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण पेरूमधील एका लहान सोन्याच्या खाणीत लागलेल्या आगीत 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. (27 people died in gold mine at Peru) दोन दशकांहून अधिक काळातील हा देशातील एकमेव प्राणघातक खाण अपघात असल्याचं सांगण्यात येत आहे.
Peru | 27 people dead after a fire broke out in a small gold mine in southern Peru, Reuters reported citing the authorities
— ANI (@ANI) May 7, 2023
स्थानिक सरकारकडुन जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात सांगण्यात आले की, पेरू देशातील अरेक्विपा या दक्षिणेकडील प्रदेशात शनिवारी पहाटेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. स्थानिक मीडिया आणि सोशल मीडियावरील प्रतिमांमध्ये साइटमधून धुराचे गडद प्लम्स बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यांनतर स्थानिक प्रशासनाला याची माहिती देण्यात आली. सध्या अग्नीशमन दलाकडुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. तर, जखमी मजुरांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
[read_also content=”‘वसुंधरा राजे आणि काही भाजप नेत्यांनी माझं सरकार पडण्यापासून वाचवलं’, मुख्यमंत्री गेहलोत यांचं खळबळजनक विधान https://www.navarashtra.com/india/rajasthan-cm-ashok-gehlot-said-vasundhara-raje-2-other-bjp-leaders-helped-to-prevent-topple-bid-by-rebels-nrps-396149/”]