Maharashtra Breaking News Updates Today:
05 Mar 2026 09:30 AM (IST)
Iranian Ship Submarine Attack: श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीवर एका इराणी जहाजावर पाणबुडीद्वारे भीषण हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात जहाजावरील सुमारे ८० जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक लोक समुद्रात बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे हिंद महासागरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून श्रीलंकेच्या लष्कराने मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
05 Mar 2026 09:25 AM (IST)
India national cricket team vs England cricket team: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा (T20 World Cup 2026) दुसरा उपांत्य सामना ५ मार्च रोजी भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात होणार आहे. हा महत्त्वाचा सामना मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) नॉकआउट सामन्यात एक खास टप्पा गाठण्याची सुवर्णसंधी आहे.
05 Mar 2026 09:20 AM (IST)
ज्योतिषशास्त्रात नवपंचम योग खूप शुभ मानला जातो. ज्यावेळी दोन ग्रह एकमेकांच्या पाचव्या आणि नवव्या घरात असतात तेव्हा हा योग तयार होतो. याला त्रिकोणी संबंध म्हणतात, जो नशीब, ज्ञान, सन्मान आणि प्रगती दर्शवितात. ज्यावेळी या संयोगात शुभ ग्रहांचा समावेश असतो तेव्हा त्याचे परिणाम आणखी अनुकूल मानले जातात. मार्च-एप्रिलमध्ये सूर्य आणि गुरु ग्रह त्रिकोणी संबंध निर्माण करत असताना एक विशेष परिस्थिती निर्माण होत आहे. गुरुवार, 5 मार्च रोजी सूर्य आणि गुरु यांच्यामध्ये एक अत्यंत प्रभावशाली नवपंचम राजयोग तयार होत आहे.
05 Mar 2026 09:15 AM (IST)
Pune Politics: पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी रस्सीखेच निर्माण झाली आहे. मिनी मंत्रालयाच्या चाव्या अनुभवी की तरुण सदस्याकडे द्यायच्या यावर पक्षात खल सुरू आहे. स्पष्ट बहुमत असलेल्या राष्ट्रवादीकडे तगडे दावेदार असल्याने कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडते. याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. (Pune Zilla parishad)
05 Mar 2026 09:10 AM (IST)
मुंबई: ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/ पाणंद रस्ता’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील १,७४,४७५ शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.आता प्रत्येक पाणंद रस्त्याला क्रमांक असेल आणि त्या क्रमांकाची नोंद सर्व रेकॉर्डवर असणार आहे, प्रत्येक गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये जाहीर करून पाणंद रस्त्यांची अधिकृत नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे चालणारे बांधावरील वाद मिटण्यास मदत होणार आहे असे उत्तर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात दिले. राज्यातील पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून त्यांची नोंद सात बारा उताऱ्यावर करण्याबाबची मोहीम कधी सुरू होणार आहे,रोजगार सेवकांना जॉब कार्ड वेळेत कधी मिळणार असे प्रश्न आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित केले होते.
05 Mar 2026 09:07 AM (IST)
नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील युद्धाच्या विध्वंसात भारत आपली हवाई संरक्षण प्रणाली आणखी मजबूत करण्यासाठी काम करत आहे. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, भारत रशियाकडून ५ नवीन एस-४०० हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्याची तयारी करत आहे. संरक्षण अधिग्रहण मंडळाने या प्रस्तावाला मान्यता रशियाशी करार दिली आहे. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंडळाने भारतीय हवाई दलाचा प्रस्ताव स्वीकारला. आवश्यकतेच्या मंजुरीसाठी तो संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेकडे सादर केला जाईल.
05 Mar 2026 09:04 AM (IST)
India vs England : २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यातील उपांत्य सामना होणार आहे. दोन्ही संघ ५ मार्च २०२६ रोजी एकमेकांसमोर येतील. दोन्ही संघ आज २०२६ च्या T20 विश्वचषकातील सेमीफायनलचा दुसरा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. हा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. कालच्या पहिल्या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला एकतर्फी पराभूत करुन फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. मुंबईतील हा सामना जिंकून टीम इंडिया अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य ठेवेल. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया ट्रॉफी जिंकण्यासाठी फेव्हरिट वाटत होती.
05 Mar 2026 08:58 AM (IST)
Nepal Election 2026 News in Marathi : काठमांडू : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये आजा संसदीय निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. या निवडणुकीकडे भारतासह संपूर्ण दक्षिण आशियाची नजर आहे. आजच्या निवडणुका नेपाळच्या राजकीय भविष्यासाठी अत्यंत निर्णयाक ठरणार आहेत. नेपाळच्या सात प्रांतामध्ये मतदानास सुरुवात झाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून नेपाळ राजकीय अस्थिरतेत होता. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असून संपूर्ण देशाचे लक्ष निकालाकडे लागले आहे.
05 Mar 2026 08:55 AM (IST)
भटकंतीची आवड असलेले लोक नेहमीच नवीन ठिकाणांच्या शोधात असतात. तुमच्याही मनात कूर्गच्या हिरव्यागार दऱ्या-खोऱ्यांत फिरण्याचं स्वप्न आहे का? आता हे स्वप्न पूर्ण करण्याची संधी भारतीय रेल्वे देत आहे. कर्नाटक राज्यातील कूर्ग हे निसर्गरम्य हिल स्टेशन असून त्याला “भारताचे स्कॉटलंड” अशीही ओळख आहे. हिरवेगार डोंगर, विस्तीर्ण कॉफीच्या बागा, धबधबे आणि शांत वातावरण यामुळे येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. एबी फॉल्स, दुबारे हत्ती कॅम्प आणि राजा सीट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत. निसर्गप्रेमींसाठी कूर्ग हे आदर्श पर्यटनस्थळ मानले जाते. या टूर पॅकेजची तिकिटे भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. वाचा सविस्तर-
अमेरिका-इस्त्रायलच्या इराणवरील हल्ल्यामुळे एक नवीन जागतिक संकट निर्माण झाले आहे. या हल्लयांमुळे या तीनही देशांत परिस्थिती अस्थिर झाली आहे. आता या संघर्षाचा परिणाम भारतावरही होत आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या लष्करी तणावामुळे, तेल पुरवठ्यात संकट येण्याची चिन्हे आहेत. भारताकडे सध्या फक्त 25 दिवसांचा कच्चा तेलाचा साठा आहे. त्यामुळे येत्या काळात इंधन तुटवडा होणार असल्याची चिन्हे असतानाच रशियाने भारताला मदतीचा हात देण्याचे आश्वासन दिले आहे.






