गेल्या काही वर्षात टेक ऑफ करताना विमानाचा अपघात होण्याचं प्रमाणं वाढलेलं दिसत आहे. आता दक्षिण अमेरिकन देश पॅराग्वेमध्ये (Plane Crash in Paraguay) एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. टेक ऑफ करताच काही वेळातच विमानाला आग लागली आणि विमानाला अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये बसलेल्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पॅराग्वेमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या कोलोरॅडो पक्षाचे खासदार वॉल्टर हार्म्स आणि त्यांच्या टीममधील तीन सदस्यांचा समावेश आहे.
[read_also content=”रणबीर कपूरच्या अॅनिमलची प्रेक्षकांमध्ये क्रेझ, दुसऱ्याही दिवशीचा कमाईचा आकडा कोटींच्या पार! https://www.navarashtra.com/movies/animal-box-office-collection-day-2-is-66-crore-nrps-485664.html”]
मिळालेल्या महितीनुसार, या विमानाने असुनसिओन येथून उड्डाण घेतल्यानंतर ते अचानक विमान कोसळले. या अपघातात कोलोरॅडो पक्षाचे खासदार आणि त्यांच्या टीममधील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पॅराग्वेचे उप राष्ट्रपती पेड्रो एलियाना यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. एलियाना यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, मला माझे सहकारी आणि मित्र वॉल्टर हार्म्स यांच्या निधनाची दुःखद बातमी मिळाली. तसेच, त्यांनी अपघाताशी संबंधित काही छायाचित्रेही शेअर केली आहेत, ज्यामध्ये विमान एका शेतात जळताना दिसत आहे. उड्डाणानंतर विमान झाडावर आदळले, त्यामुळे आग लागली, असा पोलिसांचा अंदाज आहे.
ऑक्टोबर 2023 मध्ये, कॅनडातील व्हँकुव्हरजवळील चिलीवॅक येथे हलके विमान कोसळले. या अपघातात दोन भारतीय प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला. या अपघातात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू झाला. वृत्तानुसार, ते विमानही झाडाला आदळल्यानंतर क्रॅश झाले. अपघातानंतर विमान झुडपात गेले. या अपघातात भारतीय वैमानिक अभय गद्रू आणि यश विजय रामुगडे यांचा मृत्यू झाला. हे छोटे विमान पाइपर पीए-३४ सेनेका असल्याचे सांगण्यात आले. हे 1972 मध्ये बांधले गेले आणि 2019 मध्ये नोंदणीकृत झाले.






