मध्य पूर्वेत पुन्हा युद्धाचा भडका उडणार! इस्रायल नाही तर हा देश करणार युद्धविरामाचं उल्लंघन?
मध्य पूर्वेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटू लागले आहेत. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पुन्हा भडकण्याची शक्यता आहे. यावेळी हल्ल्याची सुरुवात इस्रायलकडून नव्हे, तर इराणकडून होऊ शकते, अशी भीती जगभरातील गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे. इराणमध्ये सलग सहा दिवसांपासून स्फोट होत असून, इराणने थेट इस्रायलवर आरोप केला आहे.. हेच स्फोट युद्धविरामाचं उल्लंघन ठरवून इराणकडून पुन्हा हल्ला होऊ शकतो, असं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं आहे.
इराणच्या बुशहर शहरात सलग काही दिवस आकाशात अज्ञात वस्तू दिसत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यानंतर इराणी हवाई संरक्षण यंत्रणा अलर्ट झाली असून, त्यांनी आकाशात अनेक इंटरसेप्टर क्षेपणास्त्रं डागली आहेत. त्याचबरोबर राजधानी तेहरानमध्येही स्फोट घडल्याची माहिती आहे. एका निवासी भागात झालेल्या स्फोटानंतर इमारतीला आग लागली आहे. हे सर्व घडत असतानाही इराणकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते इराणचं हे मौन एखाद्या मोठ्या वादळाच्या आधीची शांतता असू शकते.
इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्या सैन्यदलाने मागील युद्धातून धडा घेत, आपल्या संरक्षणयंत्रणांतील अनेक कमतरता दूर केल्या आहेत. गेले 12 दिवस चाललेल्या युद्धात इराणला आपली हवाई सुरक्षा, वायुसेना व रडार प्रणालीतील उणिवा स्पष्टपणे जाणवल्या होत्या. यामुळेच इस्त्रायलचे बहुतेक हवाई हल्ले यशस्वी ठरले होते. आता मात्र इराणने चीनकडून 40 J-10 लढाऊ विमाने विकत घेत वायुसेनेला बळ दिले आहे. तसेच, चीनी व रशियन मदतीने हवाई संरक्षण यंत्रणा व रडार स्टेशनही अपग्रेड केले आहेत. यामुळेच इराण आता युद्धासाठी पूर्वीपेक्षा अधिक सज्ज आणि सक्षम आहे.
दरम्यान, इराणच्या जनरल स्टाफचे प्रमुख मेजर जनरल मौसावी यांनीही स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर यावेळी कारवाई करण्याची वेळ आलीच, तर ती पूर्वीपेक्षा अधिक तीव्र आणि विनाशकारी असेल.” इराणने आपल्या पश्चिम आणि मध्य हवाई क्षेत्राला 4 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तर युद्धाची शक्यता अधिकच वाढली आहे.
तुर्कीपासून वाचवा! खलिफा एर्दोगानच्या भूमध्य रणनितीमुळे भारताचे ‘हे’ दोन मित्र देश हैराण
जगभरातील अनेक गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, इराण-इस्रायल संघर्ष पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता दाट आहे. रशिया आणि चीनच्या सहकार्याने इराण आपल्या उणिवा भरून काढत असून, जर इराणने युद्ध छेडलेच, तर हे युद्ध केवळ इराण आणि इस्रायलपुरते मर्यादित राहील, याची शास्वती देता येत नाही. त्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं झाली असून पुन्हा एकदा जगाचं लक्ष या देशांकडे लागलं आहे.