Earthquake: ऑस्ट्रेलियात मोठा भूकंप, ५.४ रिश्टर स्केलवर तीव्रता ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Australia Earthquake : शनिवारी (दि. १६ ऑगस्ट २०२५) सकाळी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड प्रांतात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९:४९ वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता ५.६ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. जिओसायन्स ऑस्ट्रेलियाच्या माहितीनुसार, या भूकंपाची खोली फक्त १० किलोमीटर इतकी उथळ होती, त्यामुळे त्याचा परिणाम दूरवर पसरला.
या भूकंपाचे केंद्रबिंदू गुमेरी (जिम्पी प्रदेश) या छोट्या शहराजवळ होते. गुमेरी हे ठिकाण सनशाइन कोस्टच्या वायव्येस सुमारे ९० किलोमीटरवर असून, ब्रिस्बेनपासून सुमारे १५० किलोमीटर अंतरावर आहे. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण विभागाने (USGS) या भूकंपाची तीव्रता थोडी कमी म्हणजे ४.९ रिश्टर इतकी नोंदवली.
भूकंपाचे धक्के जिम्पी, किंगरॉय, सनशाइन कोस्ट, कॅबुल्चर, एस्क, किल्कोय, ब्रिस्बेन, गोल्ड कोस्ट आणि हर्वे बे अशा अनेक भागांत जाणवले. सनशाइन कोस्टमधील एका रहिवाशाने सांगितले की, “घर पूर्णपणे हादरले, खिडक्यांच्या काचा वाजू लागल्या.”टेनेरिफमधील पाच मजली इमारतीत राहणाऱ्या व्यक्तीला जवळपास ३० सेकंदांपर्यंत स्पष्ट हादरे जाणवले. बुंडाबर्गमधील एका महिलेनं सांगितले, “मला वाटलं जणू कोणीतरी माझा पलंग पुढे-मागे ढकलत आहे.” या अनुभवांवरून भूकंपाचा कालावधी कमी असला तरी, त्याची तीव्रता इतकी जास्त होती की लोक घाबरून घराबाहेर पडले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Putin Meeting: ‘पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये…’ पुतिन यांचे ट्रम्पला थेट निमंत्रण; युक्रेन युद्धावर गरमागरम चर्चा
सुदैवाने, या भूकंपामुळे कोणतीही मोठी जीवितहानी किंवा आर्थिक नुकसान झालेले नाही. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन मदत संस्था सतर्क असून कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहेत. तज्ञांच्या मते, ऑस्ट्रेलियामध्ये अशा स्वरूपाचे भूकंप अत्यंत दुर्मिळ असतात, मात्र ते पृष्ठभागाच्या उथळ भागात झाले तर त्याचा परिणाम प्रचंड प्रमाणात जाणवू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump-Putin Alaska Meeting : पुतिन-ट्रम्प भेटीत भारतच ‘गुप्त घटक’? जाणून घ्या अलास्का चर्चेचं सत्य
अवघ्या काही आठवड्यांपूर्वी रशियामध्ये ८ पेक्षा जास्त रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यावेळी पॅसिफिक महासागर परिसरात त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. त्या घटनेनंतर पुन्हा ऑस्ट्रेलियामध्ये भूकंप झाल्याने या संपूर्ण प्रदेशातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ञ सांगतात की, अशा घटना आपल्याला नेहमीच जागरूक राहण्याची आणि आपत्ती व्यवस्थापनाची गरज लक्षात आणून देतात. पॅसिफिक प्रदेशातील भूकंपीय हालचाली या पुढील काळात अधिक तपासणीस पात्र ठरणार आहेत.