बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना (फोटो- एएनआय)
नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्या ठिकाणी लष्कराच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आरक्षणाच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच आता बांग्लादेश सरकार देखील शेख हसीना यांना बांग्लादेशमध्ये परत आणण्यासाठी मोठे प्रयत्न करत आहे. बांग्लादेश सरकार शेख हसीना आणि इतर फरार नेत्यांना परत आणण्यासाठी जागतिक इंटरपोल एजन्सीची मदत घेणार आहे.
बांग्लादेशमधील अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस हे जागतिक इंटरपोल एजन्सीला रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. बांग्लादेशमध्ये सत्ताबदलाच्या आधी ज्याप्रकारे आरक्षणाचे आंदोलन झाले होते. त्यामध्ये शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शेख हसीना यांना बांग्लादेश सोडावा लागला होता. सध्या शेख हसीना या भारतातील एक सेफ हाऊसमध्ये आश्रयाला आहेत.
काय आहे रेड कॉर्नर नोटिस?
रेड कॉर्नर नोटीशीला रेड नोटिस असे देखील म्हटले जाते. जर एखादा व्यक्ती गुन्हा करून दुसऱ्या देशात पलायन करतो. तेव्हा त्या देशातील आणि जगातील सर्व पोलीस एजन्सीला सावध करण्यासाठी एक नोटिस जारी केली जाते. यालाच रेड कॉर्नर नोटिस म्हटले जाते.
हेही वाचा: Shaikh Hasina: बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीनांना सेफ हाऊसमध्ये हलवले; नेमकं कारण काय?
शेख हसीना सेफ हाऊसमध्ये
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना अमेरिका आणि इंग्लंड या देशांनी व्हिजा नाकारला आहे. सुरुवातीस शेख हसीना या हिंडन एअरबेसवर आश्रयाला होत्या. मात्र त्या ठिकाणी हवाई दलाचे ठिकाण असल्याने आणि त्या ठिकाणी शेख हंसीना यांना राहण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने त्यांना दिल्लीमधील सेफ हाऊसमध्ये हलवण्यात आले आहे. शेख हसीना यांना दिल्लीमधील लुटीयन झोनमधील एका बंगल्यात शिफ्ट केल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारने बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. लुटीयन झोनमधील एका बंगल्यात त्यांची व्यवस्था केल्याचे समजते आहे. हा बंगला विशेषतः केंद्रीय मंत्री, वरिष्ठ अधिकारी यांना दिला जातो त्यापैकी एक आहे. मात्र केंद्र सरकार आणि सुरक्षा यंत्रणेने शेख हसीना यांच्याबाबत अन्य माहिती दिलेली नाही. त्यांची सुरक्षा आणि गोपनीयता यामुळे अन्य गोष्टी समोर आलेल्या नाहीत.
हेही वाचा: Shaikh Hasina: माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ कोर्टाने जारी केले अरेस्ट वॉरंट
शेख हसीना यांच्याविरोधात अटक वॉरेंट
तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला थांबल्या आहेत. दरम्यान आता आता माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. यांचे कारण म्हणजे बांग्लादेशमधील एका कोर्टाने शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या अटक वॉरंटनुसार माजी पंतप्रधान शेख हसीना यांना १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश बांग्लादेशमधील कोर्टाने दिले आहेत.