माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ (फोटो सौजन्य-एएनआय)
नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी बांग्लादेशमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्या ठिकाणी लष्कराच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. आरक्षणाच्या विरोधामुळे मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंसाचारामुळे बांगलादेशमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना या भारतात आश्रयाला थांबल्या आहेत. दरम्यान आता आता माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नेमके हे काय प्रकरण आहे ते जाणून घेऊयात.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. यांचे कारण म्हणजे बांग्लादेशमधील एका कोर्टाने शेख हसीना यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले आहे. या अटक वॉरंटनुसार माजी पंतप्रधान शेख हसीना यांना १८ नोव्हेंबरपर्यंत हजर राहण्याचे आदेश बांग्लादेशमधील कोर्टाने दिले आहेत. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना या सध्या भारतीय हवाई दलाच्या हिंडन एअरबेसवर आश्रयाला असल्याचे सांगितले जात आहे.
बांग्लादेशमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायधिकरणाचे मुख्य अभियोक्ता यांनी याबद्दल माहिती दिल्याचे समजते आहे, शेख हसीना यांच्यावर बांग्लादेशमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान अनेक विद्यार्थ्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. तसेच बांग्लादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. शेख हसीना यांच्याविरुद्ध मानवाधिकार उल्लंघन प्रकरणाशी संबंधित अनेक प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
भारताचा शेजारील देश असलेल्या बांग्लादेशात सध्या मोठा हिंसाचार उफाळला होता. परिस्थिती ही टोकाला पोहचली होती की, आंदोलकांनी थेट पंतप्रधान शेख हसीना यांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे त्यांनी बांगलादेश सोडून भारतात आसरा घेतला आहे. तसेच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तिथे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.
भारत बांगलादेशला काय-काय निर्यात करतो? (आकडेवारी आर्थिक वर्ष 2023-२४)
– खनिज इंधन, तेल, डिस्टिलिशन उत्पादने – 2.19 अब्ज डॉलर
– कापूस 2.18 अब्ज डॉलर्स
– अन्न उद्योग, पशुखाद्य – 733.42 दशलक्ष डॉलर्स
– रेल्वे व्यतिरिक्त इतर वाहने, ट्रामवे – 593.97 दशलक्ष डॉलर्स
– यंत्रसामग्री, अणुभट्ट्या, बॉयलर – 552.41 दशलक्ष डॉलर्स
– भाजीपाला अन्य नाशवंत शेतमाल उत्पादने – 464.31 दशलक्ष डॉलर्स
– साखर आणि साखर कन्फेक्शनरी – 391.60 दशलक्ष डॉलर्स
– सेंद्रिय रसायने – 369.71 दशलक्ष डॉलर्स
– कॉफी, चहा, सोबती आणि मसाले 293.73 दशलक्ष डॉलर्स
– लोह आणि पोलाद – 287.42 दशलक्ष डॉलर्स
हेही वाचा: बांग्लादेशात राजकीय अस्थिरता; संकट मात्र भारतावर, वाचा… नेमका काय परिणाम होणार?
व्यापारिकदृष्ट्या भारताचे मोठे नुकसान होणार
परिणामी, आता बांगलादेशात राजकीय स्थिरता निर्माण झाली आहे. ज्याचा थेट परिणाम हा भारतीय निर्यात आणि व्यापारावर होणार आहे. भारत आणि बांगलादेश हे शेजारी असल्याने, दोन्ही देशांमध्ये अनेक व्यापारी करार झाले आहे. त्यावर देखील आता थेट परिणाम होणार आहे. काही बाबींमध्ये भारत बांगलादेशकडून आयात करतो. मात्र, बांगलादेश ही भारतासाठी मोठी बाजारपेठ आहे.