येमेनच्या किनाऱ्यावर उडाला आगीचा भडका; थोडक्यात बचावले भारतीय खलाशी(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, एक जहाज गॅस टॅंकर घेऊन ओमानहून जिबूतीला रवाना झाले होते. यावेळ अचानक जहाजावरील एका गॅस टॅंकरचा भीषण स्फोट झाला आणि प्रचंड आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच युरोपियन युनियनच्या नौदलाने तातडीने धाव घेतली आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी आग विझवली. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी शनिवारी (१८ ऑक्टोबर) ही घटना घडली होती.
23 Indians rescued after fire on LPG tanker off Yemen coast Read @ANI Story |https://t.co/9QnxpIYYI1#Yemen #GulfofAden #Fire #EU #Indians pic.twitter.com/Ku8ydvHwQG — ANI Digital (@ani_digital) October 20, 2025
मीडिया रिपोर्टनुसार, या जहाजावर २५ भारतीय खलाशी प्रवास करत होते. यातील २३ भारतीयांना वाचवण्यात यश आले आहे, तर दोन जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आग लागताच जहाजावरील क्रू मेंबर्सने समुद्रात उड्या मारल्या होत्या. सध्या युरोपियन युनियनचे नौदल बेपत्ता असलेल्यांचा शोध घेत आहे.
नौदल अधिकाऱ्यांनी दिलेल्या जहाजावरील पेट्रोलियम घटकांमुळे भीषण आग लागली होती. बचाव अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर जहाज पाण्यात तरंगत होती. या आगीमुळे जहाजाचे २०% नुकसान झाले आहे. सध्या आग नेमकी कशी लागली यामागाचे कारण अस्पष्ट आहे. हा अपघाती स्फोट असल्याचे सांगितले जात असून, या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.
युरोपियन युनियने दिलेल्या माहितीनुसार, या आगीमुळे सागरी मार्गावर मोठा धोका निर्माण झाला होता. जहाजवर अनेक पेट्रोलियम उत्पादने होती. यामुळे स्फोट आणखी वाढण्याचा धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात एक निवदेनही जारी करण्यात आले आहे.
ही घटना अशा वेळी घडली आहे जेव्हा येनमेनमधील हुथी बंडखोर लाल समुद्रात मालवाहून जहांवर हल्ला करत आहेत. यामुळे फाल्कन जहाजावरील या घटनेचा कोणता राजकीय संबंध आहे का याचा शोध घेतला जात आहे. पण आतापर्यंत असे कोणतेही पुरावे आढळलेले नाहीत.
FAQs(संबंधित प्रश्न)
प्रश्न १. येमेनमध्ये काय दुर्घटना घडली?
येमेनच्या एडन समुद्राच्या किनाऱ्याजवळ फाल्कन जहाजावरील एका गॅस टॅंकरचा अचानक स्फोट झाला, ज्यामुळे भीषण आग लागली होती.
प्रश्न २. येमेनच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या दुर्घटनेत किती जीवीतहानी झाली?
येमेनच्या किनाऱ्याजवळ एका जहाजावरील गॅस टँकरचा स्फोट झाला होता. या जहाजावरील २४ भारतीय होते. यातील २३ भारतीयांना वाचवले असून दोन जण बेपत्ता आहेत.






