नवी दिल्ली – अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका शिक्षण संस्थेत स्फोट झाला आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला, तर २७ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिन्यातील हा तिसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी एका मशिदीत आणि रशियन दूतावासाबाहेर स्फोट झाला होता.
काबूल पोलिसांचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी सांगितले की, अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात एका शैक्षणिक संस्थेत हा हल्ला झाला. हा हल्ला आत्मघातकी होता. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. येथील बहुसंख्य लोकसंख्या हजारा (शिया मुस्लिमांची जात) मुस्लिमांची आहे. हा गट गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे.
स्फोटानंतर तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, एका आत्मघाती हल्लेखोराने संस्थेत स्वत:ला स्फोटाने उडवले. मृत्युमुखी पडलेल्या २४ जणांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. पोलिसांनी सांगितले- स्फोटानंतर संस्था आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
दुसरी व्यक्ती म्हणाली- मी आणि माझा मित्र घरी होतो. तेवढ्यात मोठा आवाज ऐकू आला. बाहेर आलो तेव्हा घराजवळील शिक्षण संस्थेतून धूर निघताना दिसला. आम्ही तिथे गेलो. आमच्या समोर पोलिसांनी १५ जखमी आणि ९ मृतदेह बाहेर काढले. यातील अनेक मृतदेह वर्गातील खुर्च्या आणि टेबलाखाली पडलेले होते.