Free DC protest : 'अमेरिकन अत्याचार सहन करणार नाही...', डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्याच देशात घेरले; अमेरिकेत गदारोळ ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
We Are All D.C. march : “अमेरिकन अत्याचार सहन करणार नाही…” अशा घोषणांनी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी गेल्या काही दिवसांपासून दणाणून गेली आहे. स्वतःच्या देशात नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागणे, हे कोणत्याही राष्ट्राध्यक्षासाठी मोठे आव्हान ठरते. परंतु अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता अशाच स्थितीत सापडले आहेत. ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वी देशातील प्रमुख शहरांमध्ये नॅशनल गार्ड्स तैनात करण्याचा निर्णय घेतला. गुन्हेगारी कमी करणे, बेकायदेशीर स्थलांतरावर आळा घालणे आणि वारंवार होणाऱ्या निदर्शनांवर नियंत्रण मिळवणे, हा त्यामागचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, जनतेने या निर्णयाला “सत्तेचा गैरवापर” आणि “आणीबाणीची भूमिका” असे ठपके ठेवत रस्त्यावर उतरून जोरदार विरोध सुरू केला आहे.
वॉशिंग्टन डीसीमध्ये गेल्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. हजारो लोकांनी रस्त्यावर उतरून “ट्रम्प, आता तुम्हाला जावे लागेल!”, “डीसीला मुक्त करा!” आणि “अत्याचारांचा निषेध करू!” अशा घोषणा दिल्या. निदर्शक हातात फलक घेऊन व्हाईट हाऊसकडे मोर्चा घेऊन गेले. जनतेचा आरोप असा की, नॅशनल गार्ड्स तैनात करून ट्रम्प शहरात दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत. लष्करी नियंत्रणाद्वारे लोकांच्या आवाजाला गप्प करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Robinson R66 Crash : अमेरिकेत हेलिकॉप्टर कोसळले; मिनियापोलिस विमानतळाजवळ भीषण दुर्घटना, सर्व प्रवाशांचा मृत्यू
या सर्व आरोपांवर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, नॅशनल गार्ड्स तैनात केल्याने गुन्हेगारीचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. त्यांनी दावा केला की, “जर आपण नागरिकांचे रक्षण करण्यासाठी कडक उपाययोजना केल्या नाहीत, तर गुन्हेगार आणि अवैध स्थलांतरित परिस्थिती हाताबाहेर नेतील.” मात्र, या निर्णयापूर्वी स्थानिक प्रशासनाची संमती न घेणे हे डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांना आणि नागरिकांना चांगलेच पटले नाही. त्यामुळे या कारवाईला असंवैधानिक ठरवण्यात आले आहे.
ऑगस्ट २०२५ मध्ये ट्रम्प प्रशासनाने १७०० नॅशनल गार्ड्स विविध राज्यांमध्ये पाठवले. अर्कांसस, आयडाहो, इंडियाना, अलाबामा, नेब्रास्का, जॉर्जिया, लुईझियाना, साउथ डकोटा, नेवाडा, व्हर्जिनिया, वायोमिंग, ओहायो, न्यू मेक्सिको, टेक्सास, टेनेसी, युटा, आयोवा आणि फ्लोरिडा या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यातील बहुतांश जिल्ह्यांचे नियंत्रण रिपब्लिकन नेतृत्वाखाली असल्याचे विशेषत्वाने नमूद केले जाते.
Here is:
WASHINGTON, D.C.
Several thousand paid protesters are marching through the nation’s capital — openly demanding the return of homicide, rape, and robbery. pic.twitter.com/lSARpebTS0
— 🇺🇸RealRobert🇺🇸 (@Real_RobN) September 6, 2025
credit : social media
गेल्या तीन महिन्यांपासून सतत उग्र होत चाललेले हे वातावरण अमेरिकेतील लोकशाहीपद्धतीसमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. लोकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप होत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प समर्थक हे देशातील कायद्याचे राज्य टिकवण्यासाठी आवश्यक पाऊल असल्याचे म्हणत आहेत. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घडामोडींवर चर्चा सुरू झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाचा तोडगा काढण्याचे प्रयत्न आणि जागतिक टॅरिफ वॉरच्या छायेत ट्रम्प आधीच चर्चेत असताना, त्यांच्या घरच्या घरी निर्माण झालेला हा संघर्ष त्यांच्यासाठी मोठे राजकीय आव्हान ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Jinping meeting : ट्रम्प करत आहेत गुप्तपणे जिनपिंग यांना भेटण्याची तयारी; दक्षिण कोरियामध्ये एकत्र येण्याची योजना
अमेरिकेच्या रस्त्यावर उसळलेल्या या आंदोलनातून स्पष्ट होते की, लोकशाहीमध्ये जनतेचा आवाज दडपता येत नाही. नॅशनल गार्ड्सचा वापर करून नागरिकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न ट्रम्प यांना राजकीय दृष्ट्या कितपत फायदेशीर ठरेल, हे पुढील काळच सांगेल. मात्र सध्या तरी अमेरिकेत “जनता विरुद्ध ट्रम्प” अशी थेट लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.