Oil Politics: तेल खरेदीवरुन पुन्हा उडणार भडका? भारताचा अर्थसंकल्प सादर होत असताना डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा (फोटो सौजन्य: AI जनरेटेड)
डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्लोरिडा येथे विमाना एअर फोर्सच्या पत्रकारांशी बोलत असताना हे विधान केले आहे. त्यांनी म्हटले की, भारत आणि अमेरिकेत आधीच तेलावर करार झाला होता. या करारवर संपूर्ण योजना आखण्यात आली होती. दोन्ही देशांनी यासाठी मूलभूत चौकट, समजूतदार पैलूंवर चर्चा होऊन करार करण्यात आला आहे. या कराराला ट्रम्प यांनी कॉन्सेफ्ट ऑफ डील असे म्हटले आहे.
दरम्यान याच वेळी ट्रम्प यांनी असेही म्हटले की, व्हेनेझुएला (Venezuela) तेल खरेदीसाठी चीन देखील अमेरिकेसोबत करार करु शकतो. त्यांचेही अमेरिका मोठ्या उत्साहाना स्वागत करेल. ट्रम्प यांच्या मते यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात व्हेनेझुएला तेल व्यवहाराला अधिक व्यापक स्वरुप मिळेल. ट्रम्प यांच्या या विधानामुळे मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
ट्रम्प यांच्या या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प भारताला पुन्हा रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचा इशारा देत आहे. व्हेनेझुएलाकडून भारताने तेल खरेदी केल्यास रशियाकडून होणारी तेल आयात भारत कमी करेल आणि यामुळे रशियन युक्रेने युद्धाला मिळणार निधी बंद होईल असे ट्रम्प यांच्या विधानातून लक्षात येते. ट्रम्प यांचे हे विधान रशिया युक्रेन संघर्ष कमी करण्यासाठी महत्वाचा मानला जात आहे. परंतु त्यांच्या या विधानामुळे संपूर्ण जगाचे लक्ष जागतिक तेल बाजारात भारतावर लागले आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी बंद करुन व्हेनेझुएलाचा पर्याय स्वीकारणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
#WATCH | US President Donald J Trump says, “China is welcome to come in and make a great deal on oil… We’ve already made a deal. India is coming in, and they’re going to be buying Venezuelan oil as opposed to buying it from Iran. So, we’ve already made the concept of the… pic.twitter.com/278HCUHg5V — ANI (@ANI) February 1, 2026
Ans: ट्रम्प यांनी भारताचे बजेट सादर होत असतानाच दावा केला आहे की, भारत इराणकडून नाही तर व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करणार आहे. ही योजना भारत आणि अमेरिकेतील चर्चेत सादर करण्यात आली आहे. याला कॉन्स्पेफ्ट ऑफ डील असे म्हटले जात आहे.
Ans: डोनाल्ड ट्रम्प यांनीम्हटले आहे की, व्हेनेझुएलाचे तेल खरेदी करायचे असेल तर चीन देखील अमेरिकेसोबत करार करु शकतो.






