श्रीलंकेत 'अशी' साजरी केली जाते दिवाळी; तांदळाच्या पीठाने रांगोळी काढण्याची अनोखी परंपरा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
श्री जयवर्धनेपुरा कोट्टे : दिवाळी अंधारावर विजय मिळवण्याचा सण, केवळ भारतातच नाही, तर जगभरातील अनेक देशांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो. यामध्ये श्रीलंका हा एक विशेष देश आहे, जिथे तमिळ हिंदू समुदाय मोठ्या थाटामाटाने दिवाळी साजरी करतो. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते आणि लोक आपल्या पद्धतीनुसार या सणाचे आयोजन करतात.
श्रीलंकेतील तमिळ लोक दिवाळीला “लाम क्रिओंग” म्हणतात. दिवाळीच्या उत्सवाची तयारी त्यांनी लवकरच केली आहे. दिवाळीच्या पहाटे, लोक तेलाने स्नान करतात, जे त्यांच्या आरोग्य आणि कल्याणाचे प्रतीक मानले जाते. स्नानानंतर, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली जाते, ज्यामुळे घराचे सौंदर्य वाढवले जाते आणि पाहुण्यांचे स्वागत केले जाते. तांदळाच्या पिठाने तयार केलेली रांगोळी, या उत्सवाच्या सौंदर्याचा आणि भक्तीचा प्रतीक आहे.
तांदळाच्या पीठाने रांगोळी काढण्याची अनोखी परंपरा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
दिवाळीला विशेष महत्त्व असलेल्या दिव्यांच्या सजावटीत केळीच्या पानांचा उपयोग केला जातो. या पानांवर दिवे, मेणबत्त्या, नाणे आणि उदबत्ती ठेवली जातात. नंतर, या दिव्यात नदीत तरंगवले जाते, जे जीवनाच्या चक्राचे प्रतीक मानले जाते. दिव्यांचे प्रकाश आणि कृतज्ञता या दिवशी एकत्र येतात, ज्यामुळे वातावरण भक्तिपूर्ण आणि आनंददायी होते.
श्रीलंकेत दिवाळीच्या संध्याकाळी, कोलंबोमधील प्राचीन शिव मंदिर, पोन्नंबलावनेश्वर देवस्थानम येथे मोठा उपासना कार्यक्रम आयोजित केला जातो. येथे सर्व हिंदू समुदाय एकत्र येऊन प्रार्थना करतात आणि रामाचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले जातात. हा एक अत्यंत विशेष क्षण असतो, ज्यामध्ये भक्ती, एकता आणि प्रेम यांचा अनुभव घेतला जातो.
हे देखील वाचा : सौदीमध्येही साजरी केली जातेय जल्लोषात दिवाळी; क्राऊन प्रिन्सचा भारताबद्दलचा बदलतोय का दृष्टिकोन?
श्रीलंकन लोक दिवाळीत काय करतात?
दिवाळी हा सण श्रीलंकेत ‘लाम क्रिओंग’ म्हणून साजरा केला जातो. श्रीलंकेतील तमिळ हिंदू लोक या दिवशी सकाळी लवकर उठतात आणि तेल लावून स्नान करतात. येथे या दिवशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी घरांच्या मुख्य प्रवेशद्वारावर तांदळाच्या पिठाने रांगोळी काढण्याची परंपरा आहे. याशिवाय श्रीलंकेत लोक केळीच्या पानांपासून बनवलेले दिवे लावून दिवाळी साजरी करतात. इथे दिवाळीला लोक मेणबत्त्या, नाणे आणि उदबत्ती दिव्यात ठेवतात आणि नंतर नदीत तरंगतात.
श्रीलंकेत ‘अशी’ साजरी केली जाते दिवाळी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
कोलंबोच्या प्राचीन मंदिरात पूजा
श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये दिवाळीच्या संध्याकाळी, सर्व हिंदू समुदायाचे लोक प्राचीन शिव मंदिर पोन्नंबलावनेश्वर देवस्थानममध्ये प्रार्थना करण्यासाठी जातात. येथे दिवाळीच्या दिवशी रामाचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले जातात. श्रीलंकेतील दिवाळी फक्त कोलंबोमध्येच साजरी केली जाते, असे अनेक लोक मानतात, परंतु तसे नाही, हिंदू समाजाचे लोक राहत असलेल्या संपूर्ण देशात दिवाळी साजरी केली जाते.
हे देखील वाचा : लाखो दिव्यांनी उजळणार चारी दिशा; पहा रामलल्लाच्या अयोध्येत कशी साजरी होतेय दिवाळी?
वाईटावर चांगल्याच्या विजयासाठी दिवाळी साजरी केली जाते.
श्रीलंका हे रावणाचे साम्राज्य होते, आजही रावणाची देवाप्रमाणे पूजा केली जाते. म्हणूनच श्रीलंकेत दिवाळीत रामाच्या रावणावरच्या विजयाचा उल्लेख नसून वाईटावर चांगल्याच्या विजयावर भर दिला जातो. या दिवशी श्रीलंकेतील लोकही भारताप्रमाणे नवीन कपडे घालतात. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि येणाऱ्या वर्षाचे स्वागत केले जाते. श्रीलंकेप्रमाणेच म्यानमार, नेपाळ, सिंगापूर, मलेशिया आणि युरोपीय देशांमध्येही दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते.