तिबेट हादरले! मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे जोरदार झटके; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (फोटो सौजन्य: iStock)
ल्हासा: एक मोठी बातमी समोर येत आहे. तिबेटमध्ये रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता ५.७ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे केंद्रबिंदू तिबेटच्या प्रदेशात होते. या भूकंपाच्या झटक्यामुळे नागरिक मध्यरात्री घराबाहेर पळू लागले होते. पण सुदैवाने आतापर्यंत कोणत्याही जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तिबेटच्या भूकंपाचे जोरदार झटके जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी तिबेट परिसरातील भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवून आहे. याच वेळी प्रशान आणि आपत्ती व्यवस्थापन संस्था देखील अलर्टमोडवर आहेत. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने नागरिकांना घाबरुन न जाण्याचे आणि खबरदारी घेण्याचे सांगण्यात आले आहे.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्येरात्री २ च्या सुमारास तिबेटमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. यामुळे तिबेट हादरले. भूकंपाचे झटके इतके जोरदार होते की, लोक जागे झाले आणि बीतीने घराबाहेर पलू लागले. अद्याप कोणत्याही जीवीतहानी माहिती समोर आलेली नाही.
उत्तर भारताच्या अनेक भागात मुख्यत: उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमावर्ती भागात तिबेटच्या भूकंपाचा परिणाम जाणवला. यामुळे उत्तप प्रदेश आणि बिहारच्या लोकांमध्येही भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
An earthquake with a magnitude of 5.7 on the Richter Scale hit Tibet at 02.41 am (IST) today: National Center for Seismology (NCS) pic.twitter.com/NiHQVlTWWi
— ANI (@ANI) May 11, 2025
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार तिबेट हे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपाची तीव्रता मध्यम ते जास्त होती. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तिबेट हा हिमालयीन प्रदेश आहे. हा प्रदेश भूकंपाच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील आहे. या भागात सतत भूकंपाच्या घटना घडत असता. सध्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी तिबेटच्या भागातील भूगर्भीय हालचालींवर लक्ष ठेवून आहे. यामुळे कोणत्याही संभाव्य धोक्याचे वेळेत मूल्यांकन करता येईल आणि नुकसान टाळता येईल.