पाकिस्तानचा कट! अफगाणिस्तानला भारताविरुद्ध वापरण्याचा रचला होता डाव? काय आहे नेमकं प्रकरण? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
काबूल: भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (१० मे) युद्धबंदी करारा झाला. आतंर्गत दोन्ही देशांनी शस्त्रसंधी लागू केली. दरम्यान पहलगामच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशात अणुयुद्धाची भीती निर्माण झाली होती. भारताच्या पाकिस्तान आणि पाव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्ध्वस्त केल्याच्या कारवाईनंतर पाकिस्तान चवथाला होता. भारताला अणुयुद्धाची धमकी पाकिस्तानकजून दिली जात होती. दरम्यान या काळात जागतिक स्तरावर अनेक देशांनी पाकिस्तानची साथ सोडली. परंतु दूष्ट पाकिस्तानने खोटे बोल रचत अफगाणिस्तानला या युद्धात ओढण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान पाकिस्तानने भारतासोबत सुरु असलेल्या तणावादरम्यान अफगाणिस्तानला ओढण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानने दावा केला होता की, भारताच्या हल्ल्याने अफगाणिस्तानचे नुकसान झाले आहे. तथापि पाकिस्तानच्या खोट्या मनसुब्यावर अफगाणिस्तानने पाणी फेरले. अफगाणिस्तानने भारताला खरा मित्र म्हणून संबोधले. तसेच भारतावर दबाव आणण्यासाठी पाकिस्तान खोटे दावे केरत असल्याचे स्पष्ट केले. याशिवाय भारताने देखील हे दावे खंडित केले आहेत.
पाकिस्तानने दावा केला होता की, भारताने अफगाणिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. परंतु अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्लाह खाविरजमी यांनी हा दावा फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, भारताने असा कोणताही हल्ला केलेला नाही, ना ही आमचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानचे दावे निराधार आणि खोटे आहेत. अफगाणिस्तानच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड्यावर पडला आहे.
दरम्यान भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील पाकिस्तानचा हा दावा खंडित केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, आता अफगाणिस्तानच्या लक्षात आले असेल की, त्यांचा खरा मित्र कोण आणि शत्रू कोण आहे? तसेच अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन कोणी केले आहे. पाकिस्तानच्या भारताविरोधात खोट्या अफवा पसरवण्याच्या दूष्ट हेतूला जगासमोर आणण्यात आले आहे. पाकिस्तान खोट्या अफवा पसरवून भारताची प्रतिमा खराब करण्याचा आणि इतर देशांना भारताविरुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. हे विधान अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या भ्याड हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देशात संतापाचे वातवरण होते. या हल्ल्याविरोधात कारवाईची मागणी केली जात होती. हल्ल्याच्या वेळी लोकांना त्यांचा धर्म विचारुन हत्या करण्यात आली. दरम्यान या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यामागचे कारणे म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना टीआरएफने घेतली होती.
यामुळे पाकिस्तानच्या सीमापार दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्याचे म्हटले जाते. यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचा प्रशिक्षण केंद्रांना उद्ध्वस्त करुन टाकले. या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवथाळला. पाकिस्तानने भारताला धमक्या देण्यास सुरुवात केली. तसेच दहशतवाद्यांना शहीद म्हणून संबोधले. तसेच अनेक काळापासून दहशतवादाला पाठिंबा असल्याचेही अनेकदा स्पष्ट झाल्या आहेत.