तुर्कस्थान (Turkey Earthquake) आणि सीरियात (Syria Earthquake) या दशकातील सर्वात मोठा भूकंप झाला आहे.या दोन्ही देशामध्ये आतापर्यंत भूकंपामुळे मृतांची संख्या 7726 वर पोहोचली आहे. तर 42,259 लोक जखमी झाले आहे. दोन्ही देशांमध्ये आता 3 महिन्यांसाठी आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
[read_also content=”एवढा टोकाचा निर्णय! वडिलांनी दुसरं लग्न केलं म्हणून मुली झाल्या होत्या नाराज, रागाच्या भरात सावत्र आईच्या गळ्यावर केले चाकूने वार; पुढे झालं असं की… https://www.navarashtra.com/crime/rewadi-crime-news-daughter-angry-with-father-second-marriage-in-haryana-attacked-stepmother-with-knife-nrvb-368125.html”]
पृथ्वीच्या उदरात नेमकं काय घडलंय ?
तुर्कस्थानातील गजियानटेप प्रांताच्या पूर्वेला 26 किमीवर असलेल्या नूरदगी हे या भूकंपांचं केंद्र होतं. उत्तर आणि पूर्वेकडे 18 किमी परिसरात याचा तीव्र धक्का जाणवला. यामुळं तुर्कस्थान आणि सीरिया या दोन्ही देशांचं खूप मोठं नुकसान झालं.
250 पट मोठ्या तीव्रतेचा भूकंप
2013 ते 2023 चा विचार केला तर आत्तापर्यंत असे केवळ तीनच मोठे भूकंप झाले आहेत. 1822 साली 7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यात 20 हजार जण मारले गेले होते. इटलीत 2016 साली 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला होता, त्यात 300 जण मारले गेले होते. तुर्कस्थान आणि सीरियाच्या सीमेवर झालेला भूकंप हा 250 पट जास्त तीव्रतेचा होता असं सांगण्यात येतंय.