'ही' महिला अर्धा बेड देते भाड्याने, कोणीही झोपू शकतं शेजारी, पण झोपण्यापूर्वी नियम जाणून घ्या (फोटो सौजन्य-X)
Hot Bedding News in Marathi : कॅनडामध्ये वाढती महागाई आणि राहणीमानाच्या वाढत्या खर्चामुळे स्थानिकांना पैसे कमवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी विचित्र आणि आश्चर्यकारक मार्ग अवलंबण्यास भाग पाडले आहे. या लोकांपैकी एक म्हणजे ३७ वर्षीय मोनिक जेरेमिया, जिने तिचा खर्च भागवण्यासाठी विचित्र पर्याय शोधला आहे. या पर्यायाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
या महिलेचं नाव मोनिक जेरेमियाह असून ती 37 वर्षांची आहे. ही महिला ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमध्ये राहते. मोनिकने तिच्या बेडचा अर्धा भाग भाड्याने देते. ज्याला ‘हॉट बेडिंग’ म्हणून ओळखले जाते. या अनोख्या पद्धतीमुळे ती महिन्याला ५०,००० रुपयांपर्यंत अतिरिक्त कमाई कमावते. दरम्यान या संकल्पनेने काही लोकांना आश्चर्यचकित केले असले तरी, अनेकांनी ते धोकादायक आणि वादग्रस्त म्हणून वर्णन केले आहे.
कॅनडामध्ये एकटी राहणाऱ्या मोनिक जेरेमिया हिला २०२० च्या लॉकडाऊन दरम्यान आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. तिचे उत्पन्नाचे सर्व स्रोत बंद झाले होते आणि त्याच काळात तिचे ब्रेकअप देखील झाले. कॅनडामध्ये घरभाडे आणि जीवनशैलीचा उच्च खर्च तिच्यासाठी असह्य होत होता. अशा परिस्थितीत, मोनिकने तिच्या घरातील रिकाम्या बेडचा अर्धा भाग भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. तिने ऑनलाइन पोस्ट टाकली, ज्यामध्ये स्वस्त दरात अर्धा बेड भाड्याने देण्याची ऑफर दिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेक लोकांनी तिच्याशी संपर्क साधला आणि लवकरच ती अनोळखी लोकांसोबत बेड शेअर करून महिन्याला अतिरिक्त ५०,००० रुपये कमवू लागली.
‘हॉट बेडिंग’ ही एक व्यवस्था आहे, ज्यामध्ये बेडचा अर्धा भाग भाड्याने दिला जातो. ही संकल्पना कॅनडासारख्या महागड्या देशांमध्ये स्वस्त निवासस्थानाच्या शोधात असलेल्यांसाठी आकर्षक आहे. मोनिकने या व्यवस्थेसाठी काही कठोर नियम बनवले आहेत.
परस्पर संमती: बेड शेअर करणाऱ्या व्यक्तीसोबत मिठी मारणे इत्यादी कोणतीही शारीरिक जवळीक केवळ परस्पर संमतीनेच होऊ शकते. जबरदस्तीने किंवा अनुचित वर्तन करण्यास सक्त मनाई आहे.
सुरक्षा आणि गोपनीयता: सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भाडेकरूने त्यांची ओळख आणि पार्श्वभूमी माहिती प्रदान करावी लागते.
स्वच्छता: बेड आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे.
वेळेची योग्यता: भाडेकरूने बेडचा वापर निश्चित वेळेसाठी केला पाहिजे आणि त्याचा गैरवापर करता येणार नाही.
मोनिक म्हणाली की, कॅनडामध्ये महागड्या भाड्यामुळे तळघरात किंवा गर्दीच्या घरात राहण्यास भाग पाडणाऱ्यांसाठी तयार करण्यात आली आहे. तिच्या मते, ती त्यांना केवळ आर्थिक मदत करत नाही तर भाडेकरूंना एक स्वस्त आणि आरामदायी पर्याय देखील देते. अनेकांनी ही संकल्पना असुरक्षित आणि अनैतिक म्हटले आहे, विशेषतः महिलांसाठी. टीकाकारांचे म्हणणे आहे की अनोळखी लोकांसोबत बेड शेअर करणे केवळ शारीरिक सुरक्षेसाठी धोका नाही तर मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकते. दुसरीकडे, काही महिलांनी दावा केला की ते ‘हॉट बेडिंग’द्वारे पैसे देखील कमवत आहेत आणि योग्य नियमांसह, ते सुरक्षित असू शकते.
‘हॉट बेडिंग’ ही संकल्पना नवीन नाही, २०१७ मध्ये रशियातील २१ वर्षीय व्हिक्टोरिया इवाचोया हिने देखील थंड हवामानात ‘हॉट बेडिंग’ करण्याचा व्यवसाय सुरू केला, जिथे तिने प्रति रात्र ६५ युरो आकारले. महागाई आणि गृहनिर्माण संकटामुळे कॅनडामध्ये ही संकल्पना अधिक लोकप्रिय झाली. स्वस्त निवासासाठी बेड शेअरिंगची प्रकरणे ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसारख्या देशांमध्ये देखील पाहिली गेली आहेत.