IAEA on US-Iran strike : अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर केलेल्या हल्ल्यानंतर रेडिएशनची पातळी किती?? IAEA चे निवेदन जारी ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
US Iran strike IAEA response : अमेरिकेने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांवर रविवारी( दि. 22 जून 2025 ) सकाळी केलेल्या जोरदार हवाई हल्ल्यामुळे संपूर्ण जगभरात चिंता आणि अस्वस्थता पसरली आहे. या हल्ल्यांमध्ये अमेरिका यांनी बंकर बस्टर बॉम्ब आणि टोमाहॉक क्षेपणास्त्रांचा वापर करत इराणच्या तीन महत्त्वाच्या अणुस्थळांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या निवेदनात फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान ही अणुउर्जा केंद्रे नष्ट केल्याचे सांगितले.
या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणावाचा स्तर झपाट्याने वाढला असून, यामुळे केवळ इराणच नव्हे तर संपूर्ण जागतिक अणु सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात रेडिएशन गळती झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा संस्थेने यावर स्पष्ट भूमिका घेतली आहे.
हल्ल्याच्या काही तासांनंतरच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक निवेदन प्रसिद्ध करत माहिती दिली की, “IAEA पुष्टी करू शकते की आतापर्यंत अणुस्थळांच्या बाहेर कोणतीही रेडिएशनची पातळी वाढलेली नाही.” म्हणजेच, हल्ल्यामुळे आसपासच्या परिसरात अजून तरी किरणोत्सर्गजन्य गळती झाल्याचे पुरावे मिळाले नाहीत. IAEA च्या निरीक्षकांनी या घटनाक्रमावर बारकाईने लक्ष ठेवले असून, संस्थेच्या निदर्शनात आलेली प्राथमिक माहिती दिलासा देणारी आहे. मात्र परिस्थिती अजूनही गंभीर असून, त्यावर अधिक सखोल चर्चा आवश्यक असल्याचे IAEA चे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी नमूद केले आहे.
IAEA @RafaelMGrossi addressed @UN Security Council #UNSC on the situation in Iran, stressing that attacks on its nuclear sites have caused a “sharp degradation in nuclear safety and security”.
“The IAEA will not stand idle during this conflict,” he said. https://t.co/uUg2bDRhy9 pic.twitter.com/A6pDvQRMu9
— IAEA – International Atomic Energy Agency ⚛️ (@iaeaorg) June 20, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : ‘इराणला कधीही अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही’, असे का म्हणाले ब्रिटिश पंतप्रधान?
या पार्श्वभूमीवर IAEA ने आपल्या प्रशासक मंडळाची आपत्कालीन बैठक बोलावली आहे. ग्रॉसी यांनी म्हटले आहे की, “इराणमध्ये उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता मी IAEA प्रशासक मंडळाची आपत्कालीन बैठक उद्या आयोजित करत आहे.” या बैठकीमध्ये हल्ल्याचे परिणाम, भविष्यातील धोके आणि जागतिक अणुउर्जा सुरक्षेवर याचा होणारा परिणाम या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या हल्ल्यामुळे जागतिक पातळीवर तणाव वाढला आहे. याआधी इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध अत्यंत तणावपूर्ण होते. परंतु अणुस्थळांवर थेट हल्ला केल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय निरीक्षक आणि विश्लेषकांनी या कृतीमुळे मध्य पूर्वेत आणखी एका युद्धाचा धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
Following attacks on three nuclear sites in Iran – including Fordow – the IAEA can confirm that no increase in off-site radiation levels has been reported as of this time.
IAEA will provide further assessments on situation in Iran as more information becomes available.— IAEA – International Atomic Energy Agency ⚛️ (@iaeaorg) June 22, 2025
credit : social media
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Iran strikes : गुप्तचर यंत्रणेत झाली मोठी चूक? अमेरिकेने जिथे बॉम्ब टाकला होता तिथून इराणने आधीच…
सद्यस्थितीत रेडिएशन गळती झाली नसल्याचे IAEA ने स्पष्ट केले असले तरी, हल्ल्याचे परिणाम दीर्घकालीन असू शकतात. अणुस्थळे नष्ट झाल्यानंतर इराणची अणुकार्यक्रमाशी संबंधित क्षमता मोठ्या प्रमाणावर बाधित झाली आहे. IAEA च्या बैठकीतून पुढील धोरणात्मक पावले निश्चित होतील. मात्र, जागतिक शांतता आणि अणुशस्त्र नियंत्रणासाठी हे क्षण अत्यंत निर्णायक मानले जात आहेत. पुढील काही दिवसांत अमेरिकेच्या या हल्ल्याला इराण कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.