Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत-कॅनडा संबंधामध्ये नव्या पर्वाची सुरुवात? पंतप्रधान मार्क कार्नी लवकरच भारत दौऱ्यावर येणार

Mark Carney India Visist : भारत-कॅनडा संबंधामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी २०२६ मध्ये भारताला भेट देण्याची शक्यता आहे. परंतु सध्या खलिस्तानींमध्ये यामुळे संताप उसळला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 25, 2025 | 08:20 PM
India Canada Relations PM Markh Carney to Visit India Next Year

India Canada Relations PM Markh Carney to Visit India Next Year

Follow Us
Close
Follow Us:
  • भारत-कॅनडा संबंधामध्ये सुधार
  • पंतप्रधान मार्क कार्नी येणार भारताच्या दौऱ्यावर
  • या मुद्यांवर होणार चर्चा
India-Canada Relations : नवी दिल्ली : भारत आणि कॅनडा (Canada) संबंधामध्ये सुधारणा होताना दिसत आहे. नुकतेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची जोहान्सबर्ग येथे जी-२० दरम्यान भेट झाली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय व्यापारावर स्वतंत्र चर्चा झाली. याच पार्श्वभूमीवर कार्नी २०२६ मध्ये भारताला भेट देण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींनी त्यांना भारत दौऱ्याचे आमंत्रण दिले आहे.

खलिस्तानींनी पुन्हा भारताविरोधी ओकले विष; तिरंग्याचा अपमान अन् घोषणाबाजी करत कॅनडाच्या रस्त्यांवर गोंधळ

२०२६ च्या सुरुवातील मार्क कार्नी भारतात येणार

कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान कार्नी २०२६ मध्ये भारताला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरुन ते भारतात येते आहे. २०२६ च्या सुरुवातीला त्यांचा हा दौरा होणार आहे. सध्या याची तयारी असून तारीख निश्चित करण्याचे काम सुरु आहे. दोन्ही देशांमध्ये जी-२० परिषदेवेळी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा अशा विविधा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली होती.

तसेच संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातही संबंध पुढे नेण्यावर विचारांची देवाण-घेवाण झाली. निवदेनानुसार, भारत आणि कॅनडामध्ये वस्तू, सेवा, गुंतवणूक, शेती, डिजिटल व्यापार आणि शाश्वत विकासावर संपर्क वाढवला जाणार आहे. यासाठी महत्त्वकांक्षी व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) करण्याची सहमती दोन्ही नेत्यांनी दर्शवली आहे.या सर्व घडामोडींवर आणि दोन्ही नेत्यांच्या वार्तालापवरुन लक्षात येते की भारत आणि कॅनडा संबंधामध्ये पुन्हा एकदा सुधार होत आहे.

मोदी-कार्नी बैठकीवर संतापले खलिस्तानी

या रॅलीमध्ये कॅनडाच्या ओंटारियो, अल्बर्टा आणि ब्रिटिश कोलंबिया आणि क्यूबेकमधील ५३ हजाराहून अधिक खलिस्तानी समर्थकांनी भाग घेतला होता. यावेळी लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. तसेच भारतीय ध्वज फाडला. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

भारत-कॅनडा संबंध का बिघडले होते?

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर यांची १८ जून २०२३ रोजी हत्या करण्यात आली होती. कॅनडाती एका गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान निज्जरच्या हत्येप्रकरणी  कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारताच्या सहभागाचा आरोप केला होता. ज्यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले. परंतु कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या दोन्ही देशांतील संबंध सुधारण्याच्या सकारात्मक दृष्टीकोनाने संबंधामध्ये पुन्हा सुधारणा होताना दिसत आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारी 

शिवाय याच वेळी जी-२० दरम्यान भारत, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात ACITI भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे.  या तिन्ही देशांनी तंत्रज्ञान आणि नव्या संकल्पनेच्या विकासासाठी ही घोषणा केली आहे.

जागतिक व्यासपीठावर नवे टेक-त्रिकुट! भारत-ऑस्ट्रेलिया-कॅनडाची ACITI भागीदारीची मोठी घोषणा

💡

Frequently Asked Questions

  • Que: कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी भारत दौऱ्यावर कधी येणार आहेत?

    Ans: कॅनडाच्या पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान कार्नी २०२६ मध्ये वर्षाच्या सुरुवातील भारताला भेट देणार आहेत.

  • Que: भारत-कॅनडा संबंध का बिघडले होते?

    Ans: कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी निज्जर हत्याकांडात भारताच्या सहभागाचा आरोप केला होता, ज्यामुळे भारत आणि कॅनडातील संबंध बिघडले होते.

  • Que: जी-२० मध्ये पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी यांच्यात कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली?

    Ans: जोहान्सबर्ग येथे जी-२० दरम्यान पंतप्रधान मोदी आणि मार्क कार्नी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा अशा विविधा क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली होती. तसेच संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रातही संबंध पुढे नेण्यावर विचारांची देवाण-घेवाण झाली

Web Title: India canada relations pm markh carney to visit india next year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 08:20 PM

Topics:  

  • Canada
  • World news

संबंधित बातम्या

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’
1

शत्रूच्या मनात घर करु पाहत आहेत डोनाल्ड ट्रम्प; AI चा शस्त्र म्हणून वापर करत लॉन्च केले ‘Genesis Mission’

Russia Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या चर्चा… पण रशियाचा युक्रेनवर प्रहार सुरुच; कीववर एका रात्रीत २४९ ड्रोन्सचा मारा
2

Russia Ukraine War : युद्ध थांबवण्याच्या चर्चा… पण रशियाचा युक्रेनवर प्रहार सुरुच; कीववर एका रात्रीत २४९ ड्रोन्सचा मारा

खलिस्तानींनी पुन्हा भारताविरोधी ओकले विष; तिरंग्याचा अपमान अन्  घोषणाबाजी करत कॅनडाच्या रस्त्यांवर गोंधळ
3

खलिस्तानींनी पुन्हा भारताविरोधी ओकले विष; तिरंग्याचा अपमान अन् घोषणाबाजी करत कॅनडाच्या रस्त्यांवर गोंधळ

Sindh Debate : ‘दिवसा स्वप्नं पाहणं बंद करा’ ; राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर भडकले सिंधचे CM
4

Sindh Debate : ‘दिवसा स्वप्नं पाहणं बंद करा’ ; राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यावर भडकले सिंधचे CM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.