Iran Blast : युद्ध की घातपात? इराणमध्ये एकामागून एक भीषण धमाके; इस्रायली हल्ला असल्याचा संशय (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (31 जानेवारी 2026) इराणच्या प्रमुख अब्बास बंदरावरही भीषण स्फोट झाला होता. या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. यामध्ये अब्बास बंदरावरील एका आठ मजली इमारतीमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटामुळे आसपासच्या इमारतींनाही आग लागली होती. यामुळे प्रचंड नुसकसान झाले होते. दरम्यान या स्फोटाच्या काही तासानंतर आणखी एक स्फोट झाला. ज्यामध्ये इराणच्या अहवाज शहरातील एका रहिवाशी इमारतीत स्फोट झाला होता. यात स्फोटात पाच जण जागीच ठार झाले तर 14 जण जखमी झाले आहेत.
सध्या या स्फोटाचे कारण अस्पष्ट आहे. परंतु हे स्फोट अशा वेळी झाले आहेत जेव्हा अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. तसेच अमेरिकेने इराणला सैन्य वेढाई घातला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यामुळे काही तज्ज्ञांच्या मते हा अपघात नसून हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे. सध्या इराणने देखील या स्फोटात कोणत्या बाह्य देशाचा समावेश असल्याचे अधिकृत घोषणा केलेली नाही. स्फोटाचा तपास सुरु करण्यात आला आहे. आपत्कालीन आणि बचाव पथकांनी जखमींना रुग्णलयात दाखल केले आहे.
इस्रायलची प्रतिक्रिया
दरम्यान इस्रायलने या स्फोटांपासून दूर राहण्याचे जाहीर केले आहे. इस्रायली (Israel) अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, इराणमध्ये अब्बास बंदरावर आमि अहवाज शहरात झालेल्या स्फोटांमध्ये ज्यू देश इस्रायलचा कोणत्याही प्रकारचा सहभाग नाही.
BREAKING: Explosions reported across Iran — at least 7 cities Tehran, Bandar Abbas, Tabriz, Parand, Qeshm, Nowshahr, Ardabil North, south, east, west. All within hours. Neither Israel nor the US have commented. This is not gas leaks. This is coordinated. pic.twitter.com/kVoHzhxdDn — Conflict Alarm (@ConflictAlarm) January 31, 2026
इराण हादरलं! अमेरिकेशी तणावादरम्यान बंदर अब्बासवर भीषण स्फोट; घात की अपघात?
Ans: इराणच्या अहवाज शहरातील एका रहिवाशी इमारतीत भीषण स्फोट झाला आहे.
Ans: इराणमध्ये अब्बास बंदरावरील हल्ल्यात चार जणांचा मृत्यू, तर अहवाज शहरातील हल्ल्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच १० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.






