पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे
सुंदर दिसण्यासाठी सर्वच स्त्रिया पारंपरिक, इंडोवेस्टर्न इत्यादी अनेक वेगवेगळ्या स्टायलिंगचे कपडे परिधान करतात. कपड्यांची शोभा वाढवण्यासाठी पायात उंच टाचेच्या चप्पल घातल्या जातात. उच्च टाचेच्या चप्पल केवळ सुंदर दिसण्यासाठी नाहीतर उंची जास्त दिसावी म्हणून सुद्धा घातल्या जातात. पण वारंवार उंच टाचेच्या हिल्स किंवा चप्पल घातल्यामुळे पायांना हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे संपूर्ण शरीराचा जोर पायांच्या तळव्यांवर येतो, ज्यामुळे चालताना किंवा उभं राहिल्यानंतर खूप जास्त वेदना होतात. त्यामुळे दैनंदिन वापरात हिल्स किंवा पायांमध्ये वेदना वाढवणाऱ्या चप्पल अजिबात घालू नये. जास्त वजनामुळे पायांच्या टाचांवर तणाव येऊन सूज वाढते. या समस्येला प्लांटर फॅसिआयटीस असे सुद्धा म्हणतात.(फोटो सौजन्य – istock)
उंच टाचेच्या चप्पल घातल्यामुळे टाच ते पायाच्या बोटांपर्यंत जाणाऱ्या स्नायूंच्या पट्टीव खूप जास्त ताण येतो. तसेच यामुळे सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा पाय जमिनीवर ठेवल्यास टाचा खूप जास्त दुखतात. या समस्येला ‘हील स्पर’ असे सुद्धा म्हणतात. चुकीचे किंवा घट्ट पादत्राणे वापरणे, पायाची ठेवण, लांब अंतर चालणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे पायांच्या टाचा दुखावल्या जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हील स्पर्स आणि सायटिकाची लक्षणे काय? टाचांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
टाचांच्या पुढच्या भागात वेदना, अस्वस्थता, सूज आणि जळजळ जाणवू लागते. याशिवाय संधिवात, टाच फोडणे, शरीराचे जास्त वजन, खराब फिट केलेले, शूज, चालताना चालण्याच्या समस्यामी फ्लिप-फ्लॉप खूप वेळा वापरणे, जीर्ण झालेले शूज इत्यादी अनेक कारणामुळे पायांच्या टाचांमध्ये खूप जास्त वेदना होतात. काहीवेळा या वेदना खूप जास्त असह्य होतात. चालताना, धावताना किंवा कठीण पृष्ठभागावर उडी मारताना वारंवार येणारा दबाव हे टाचेच्या स्पर्सचे एक सामान्य कारण आहे. पायाला योग्यरित्या आधार न देणारे शूज घालल्याने देखील पायांच्या टाचांमध्ये वेदना वाढतात.
पायांच्या टाचांमधील रक्तभिसरण सुधारण्यासाठी पायांना पुरेसा आराम देणे आवश्यक आहे. यामुळे टाचांमधील वेदना कमी होतात. जास्त एका जागेवर उभे राहणे टाळावे. योग्य आकाराची आणि मऊ तळव्याची चपल किंवा बूट वापरावेत. यामुळे टाचांमध्ये वेदना होत नाहीत. टाचांमधील वेदना शांत करण्यासाठी थंड आणि गरम पाण्याच्या पिशवीने पाय शेकवावे. पायांच्या स्नायूंमध्ये वाढलेला ताठरपणा कमी करण्यासाठी हलके व्यायाम, स्ट्रेचिंग आणि पायाची साधी मालीश करावी. यामुळे गोठलेले रक्त आणि टाचांमधील स्नायू रिलॅक्स होतील. टाचांची मालिश केल्यामुळे पायांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतील.






