CJ Roy Death: आयकर छाप्याचा धसका की आणखी काही? 'कॉन्फिडंट ग्रुप'च्या अध्यक्षांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; कोट्यवधींच्या साम्राज्याचा मालक एका क्षणात संपला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Confident Group Chairman death Bangalore : कर्नाटक आणि केरळच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक अतिशय वजनदार नाव, ‘कॉन्फिडंट ग्रुप’चे (Confident Group) संस्थापक आणि अध्यक्ष डॉ. सीजे रॉय (Dr. CJ Roy) यांच्या मृत्यूच्या वृत्ताने संपूर्ण दक्षिण भारत हादरला आहे. आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाईदरम्यान निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक दबावातून रॉय यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्राथमिक वृत्त समोर आले आहे. ज्या व्यक्तीने शून्यातून विश्व निर्माण केले आणि १५० हून अधिक मोठे प्रकल्प पूर्ण केले, त्या नेत्याचा असा दुर्दैवी अंत झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग सीजे रॉय यांच्या व्यावसायिक व्यवहारांची कसून चौकशी करत होता. बेंगळुरू येथील त्यांच्या मुख्य कार्यालयात अधिकाऱ्यांची उपस्थिती असतानाच, रॉय यांनी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले आणि परवानाधारक बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकताच कर्मचारी आणि अधिकारी त्या दिशेने धावले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे आयकर विभागाच्या चौकशी पद्धतीवर आणि रॉय यांच्यावर असलेल्या दबावावर आता चर्चा सुरू झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : BRICS :भारताचा ‘मास्टरस्ट्रोक’! डॉलरची मक्तेदारी संपवण्यासाठी 11 देशांची मोठी तटबंदी; ट्रम्प यांच्या धमकीला मोदींचे ‘डिजिटल’ उत्तर
सीजे रॉय हे केवळ एक बिल्डर नव्हते, तर ते एक ‘बिझनेस टायकून’ होते. बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेल्या कॉन्फिडंट ग्रुपचा विस्तार अनेक क्षेत्रांत होता:
१. रिअल इस्टेटचा कणा: समूहाने दक्षिण भारतात १५० हून अधिक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प राबवले आहेत. लक्झरी व्हिला, अपार्टमेंट्स आणि भव्य टाउनशिपसाठी ही कंपनी ओळखली जाते. बेंगळुरू, कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये त्यांचे मोठे वर्चस्व आहे.
२. मनोरंजन आणि ग्लॅमर: सीजे रॉय यांचे मल्याळम चित्रपटसृष्टीशी जवळचे संबंध होते. ‘कॅसानोव्हा’ आणि ‘मारक्कर’ यांसारख्या मोठ्या बजेटच्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. विशेष म्हणजे, ‘बिग बॉस मल्याळम’ या अतिशय लोकप्रिय शोचे ते मुख्य प्रायोजक होते, ज्यामुळे घराघरात त्यांचे नाव पोहोचले होते.
#BREAKING Terribly tragic news coming in from Bengaluru Popular businessman CJ Roy, founder of Confident Group, has reportedly died by suicide Sources say he allegedly shot himself after Income Tax raids were launched at his office. Officials were present at the premises at… pic.twitter.com/sfcmj71TjK — Nabila Jamal (@nabilajamal_) January 30, 2026
credit – social media and Twitter
३. शिक्षण आणि आदरातिथ्य: बेंगळुरूमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘कॉन्फिडंट गियर इनोव्हेटिव्ह इंटरनॅशनल स्कूल’ त्यांनी स्थापन केली. याशिवाय दक्षिण भारतात त्यांची आलिशान हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सची साखळी देखील आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-EU FTA: भारताच्या एका सहीने होणार पाकिस्तान कंगाल? 1 कोटी लोकांच्या नोकऱ्या धोक्यात; ‘या’ महाकरारामुळे इस्लामाबादमध्ये खळबळ
विटा आणि सिमेंटच्या व्यवसायापलीकडे जाऊन रॉय यांनी चार्टर्ड एव्हिएशन (विमान सेवा) क्षेत्रातही गुंतवणूक केली होती. त्यांच्याकडे स्वतःची खाजगी विमाने आणि हेलिकॉप्टर सेवा होती. याव्यतिरिक्त, परफ्यूम ब्रँड्स आणि बांधकाम साहित्याचा आंतरराष्ट्रीय व्यापार अशा विविध क्षेत्रांत त्यांनी हातपाय पसरले होते. एका साध्या पार्श्वभूमीतून आलेला माणूस इतके मोठे साम्राज्य उभे करतो आणि शेवटी आयकर छाप्याच्या भीतीने आपले आयुष्य संपवतो, ही बाब उद्योजकांसाठी अत्यंत क्लेशदायक ठरली आहे.
सीजे रॉय यांनी कोणतीही सुसाईड नोट सोडली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. आयकर विभागाला त्यांच्या व्यवसायात नेमकी कोणती अनियमितता आढळली होती, ज्याचा रॉय यांनी इतका धसका घेतला? या प्रकरणाचा तपास आता सखोलपणे केला जाणार आहे. त्यांच्या निधनानंतर कॉन्फिडंट ग्रुपच्या शेकडो प्रकल्पांचे आणि हजारो कर्मचाऱ्यांचे भविष्य आता टांगणीला लागले आहे.
Ans: प्राथमिक अहवालानुसार, त्यांच्या कंपन्यांवर आयकर विभागाचे छापे आणि चौकशी सुरू होती, ज्याच्या मानसिक दबावाखाली त्यांनी हे पाऊल उचलले असावे.
Ans: हा ग्रुप प्रामुख्याने रिअल इस्टेट (घरबांधणी), हॉस्पिटॅलिटी, शिक्षण, विमान वाहतूक आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रांत कार्यरत आहे.
Ans: डॉ. सीजे रॉय यांचा 'कॉन्फिडंट ग्रुप' हा 'बिग बॉस मल्याळम' या प्रसिद्ध टीव्ही शोचा मुख्य प्रायोजक होता.






