फोटो सौजन्य- pinterest
फेब्रुवारी महिना खूप खास मानला जातो. फेब्रुवारी महिन्याची सुरुवात आज 1 फेब्रुवारीपासून झाली आहे. ग्रहांच्या हालचालीनुसार देखील हा महिना खास मानला जातो. या महिन्याध्ये ज्यांना घरामध्ये शुभ कार्यक्रमाचे आयोजन करायचे त्यांच्यासाठी हा महिना खास आहे. या महिन्यात विवाह, वाहन, मालमत्ता, गृहप्रवेश असे शुभ कार्यक्रमांसाठी फेब्रुवारी महिन्यात अनेक शुभ मुहूर्त आहेत. फेब्रुवारी महिन्यातमध्ये विवाह, वाहन, मालमत्ता, गृहप्रवेश करण्यासाठी कोणते शुभ मुहूर्त आहेत ते जाणून घेऊया
जर तुम्ही फेब्रुवारी महिन्यात विवाहाची योजना आखत असाल तर यासाठी तुम्हाला एकूण 11 मुहूर्त आहेत
गुरुवार 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.7 ते 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 07.06 वाजेपर्यंत मुहूर्त आहे यावेळी उत्तराफाल्गुनी हस्त नक्षत्र असेल. तर चतुर्थी, पंचमी तिथी असेल.
शुक्रवार 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.6 ते रात्री 11.37 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी हस्त नक्षत्र राहील तर पंचमी तिथी असेल.
रविवार, 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 12.08 ते 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 05.02 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी स्वाती नक्षत्र राहील तर सप्तमी तिथी असेल.
मंगळवार, 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:55 ते 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 01:42 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी अनुराधा नक्षत्र राहील तर नवमी तिथी असेल.
गुरुवार, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 08:20 ते 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 03:06 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी मूल नक्षत्र राहील तर एकादशी तिथी असेल.
शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 06:16 ते 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 03:18 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी उत्तराषाढ़ा नक्षत्र राहील तर त्रयोदशी तिथी असेल.
गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री 08:52 ते 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:55 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी उत्तर भाद्रपद नक्षत्र राहील तर तृतीया तिथी असेल.
शुक्रवार, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:55 ते 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 01:51 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी उत्तर भाद्रपद, रेवती नक्षत्र राहील तर तृतीया, चतुर्थी तिथी असेल.
मंगळवार, 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 04:26 ते 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:50 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी रोहिणी नक्षत्र राहील तर नवमी तिथी असेल.
बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 01:28 ते 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:49 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी मृगशिरा नक्षत्र राहील तर नवमी, दशमी तिथी असेल.
गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:49 ते रात्री 12:11 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी मृगशिरा नक्षत्र राहील तर दशमी तिथी असेल.
फेब्रुवारी महिन्यात गृहप्रवेश करण्याचा विचार करत असाल तर या महिन्यात 7 मुहूर्त आहेत.
शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 12:23 ते 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 01:18 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी चित्रा नक्षत्र राहील तर हस्त तिथी असेल.
बुधवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 09:58 ते 10:53 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी ज्येष्ठा, अनुराधा नक्षत्र राहील.
गुरुवार, 19 फेब्रुवारी रोजी रात्री 08:52 ते 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:55 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी उत्तर भाद्रपद नक्षत्र राहील
शुक्रवार, 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:55 ते दुपारी 02:38 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी उत्तर भाद्रपद नक्षत्र राहील.
शनिवार, 21 फेब्रुवारी रोजी दुपारी 01:00 ते संध्याकाळी 07:07 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी रेवती नक्षत्र राहील.
बुधवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी 02:40 ते 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:49 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी मृगशिरा नक्षत्र राहील.
गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:49 ते दुपारी 12:11 PM वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी मृगशिरा नक्षत्र राहील.
फेब्रुवारी महिन्यात मुंज करण्यासाठी 2 मुहूर्त आहेत.
शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:59 ते दुपारी 01:55 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी हस्त, लग्न नक्षत्र राहील. तर कृष्ण पंचमी तिथी राहील.
बुधवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:39 ते दुपारी 01:35 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी ज्येष्ठा नक्षत्र राहील. तर कृष्ण दशमी तिथी राहील.
जर तुम्हाला या महिन्यात नवीन वाहनाची खरेदी करायची असल्यास त्यासाठी 5 मुहूर्त आहेत.
रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:09 ते दुपारी 11:58 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी पुष्य नक्षत्र आहे तर पौर्णिमा तिथी आहे.
शुक्रवार, 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:06 ते 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 07:06 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी हस्त, चित्रा नक्षत्र आहे तर पंचमी, षष्ठी तिथी आहे.
बुधवार, 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 09:58 ते सकाळी 10:53 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी ज्येष्ठा, अनुराधा नक्षत्र आहे तर दशमी, नवमी तिथी असेल.
गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 06:49 ते दुपारी 12:11 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी मृगशिरा नक्षत्र राहील. तर दशमी तिथी राहील.
शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:48 ते रात्री 10:32 वाजेपर्यंत मुहूर्त आहे. यावेळी पुनर्वसु नक्षत्र राहील तर एकादशी तिथी असेल.
मालमत्ता खरेदी करण्यासाठी फेब्रुवारीत काही मुहूर्त आहेत 12, 13, 19, 20, 26, 27 या दिवशी तुम्ही वाहन खरेदी करू शकता.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: पंचांगानुसार तिथी, वार, नक्षत्र आणि योग यांचा अनुकूल संयोग जुळून येतो तो काळ शुभ मुहूर्त मानला जातो. या वेळी केलेली कामे यशस्वी आणि मंगलकारी ठरतात.
Ans: पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, त्रयोदशी आणि पौर्णिमा या तिथी बहुतेक शुभ कार्यांसाठी अनुकूल मानल्या जातात
Ans: कार्य निर्विघ्न पार पडते, दीर्घकाळ शुभ फल मिळते आणि मानसिक समाधान लाभते, असे धार्मिक मत आहे.






