अमेरिका-इराणमध्ये संघर्ष तीव्र (फोटो- सोशल मीडिया)
अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला
अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हॉल करण्याच्या तयारीत
अणु करारावरील जिनेव्हा येथील चर्चा
America Vs Iran: गेली काही महिन्यांपासून इराण आणि अमेरिकेत संघर्षाचे वातावरण आहे. इराण अंतर्गत समस्येला देखील तोंड देत आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इराण आणि अमेरिकतील शांतता चर्चा निष्फळ ठरल्याचे समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यास हा लहान हल्ला नसून किमान ६ आठवडे चालू राहील एवढा मोठा युद्ध संग्राम असू शकतो. त्यामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे.
दोन्ही देशांमधील तणाव कमी होण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये तीन तासांपेक्षा जास्त काळ दीर्घ चर्चा करण्यात आली. काही विषयांवर सहमती झाली असली तरी अनेक मुद्यांवर तीव्र विरोध दिसून आला. इराण पूर्णपणे शरण यायला तयार नाहीये. चर्चा रास्ता बंद झाल्यास सैन्य कारवाई हा एकमेव पर्याय असल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
इराणमध्ये उद्यापासून रमजानचा पवित्र महिना सुरू होणार आहे. याच दरम्यान अमेरिका युद्धाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकेने इराणला दोन आठवड्यांची मुदत दिल्याचे समोर आले आहे. या कालावधीत काही प्रतिसाद न आल्यास मोठी लष्करी कारवाई केली जाण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.
इस्त्रायलने देखील आपले सैन्य अलर्ट मोडवर ठेवले आहे. इस्त्रायलने देखील या युद्धात उडी घेण्याची तयारी केली आहे. अमेरिका लष्कर युद्धाची तयारी करत असल्याचे म्हटले जात आहे. अमेरिकेने मिडल ईस्टमध्ये दोन विशाल एअरक्राफ्ट, डझनभर युद्धनौका, शेकडो लढाऊ विमाने, अत्याधुनिक एअर डीफेंस सिस्टिम, मोठ्या प्रमाणात दारुगोळा साठवण्याची तयारी सुरू आहे.
US Iran Conflict : ‘युद्ध हाच एकमेव मार्ग…’ ; इराण-अमेरिका अणु चर्चेवर इस्रायलचा खळबळजनक दावा, मध्यपूर्व पेटणार?
खामेनेईंचा ट्रम्प यांना थेट इशारा
अमेरिका आणि इराणमधील तणाव हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एककीडे दोन्ही देशांमध्ये इराणच्या अणु कार्यक्रमावर वाटाघाटी चर्चा सुरु आहे. परंतु अद्यापर कोणताही ठोस निकाल लागलेला नाही. याच वेळी दुसरीकडे अमेरिकेने चर्चेच्या आड मोठा गेम केला आहे. मध्यपूर्वेतील कॅरिबियन समुद्रात अमेरिकेने युद्धनौकांची तैनाती वाढवली आहे. यामुळे इराणने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली अयातुल्ला खामेनेई यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिला आहे. त्यांनी अमेरिकन युद्धनौका समुद्रात बुडवण्याची धमकी दिली आहे.






