
islamabad peace talks us iran pakistan risk india global power 2026
Seth Frantzman on India Pakistan 2026 : सध्या संपूर्ण जगाचे लक्ष पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादकडे (Islamabad ) लागले आहे. अनेक वर्षांच्या राजकीय वनवासानंतर पाकिस्तानच्या रस्त्यांवर अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेचे मोठे फलक झळकत आहेत. शाहबाज शरीफ सरकार याला आपले मोठे राजनैतिक यश मानत असून पाकिस्तानी सोशल मीडियावर भारतावर टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये. मात्र, या सर्व गदारोळात जागतिक तज्ज्ञांनी एक असा दावा केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानच्या आनंदावर विरजण पडू शकते आणि भारताचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मध्यपूर्वेतील प्रख्यात सुरक्षा विश्लेषक सेठ फ्रँट्झमन यांच्या मते, ही चर्चा पाकिस्तानसाठी एक मोठा धोका (Risk) आहे. पाकिस्तानची स्थिती सध्या ‘दुधारी तलवारी’सारखी आहे. जर त्यांनी अमेरिका आणि इराणमध्ये यशस्वी करार घडवून आणला, तर इस्लामिक जगात त्यांचे स्थान मजबूत होईल आणि ट्रम्प प्रशासनाच्या ते जवळ जातील. मात्र, जर ही चर्चा निष्फळ ठरली, तर आधीच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नुकसान होऊ शकते. पाकिस्तानने या चर्चेसाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे, कारण त्यांना आपली गेलेली विश्वासार्हता पुन्हा मिळवायची आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait : ‘आम्हाला जागाच आठवत नाही!’ इराणच्या ‘या’ उत्तराने अमेरिकाही चक्रावली; होर्मुझमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा
पाकिस्तानमध्ये या चर्चेचे यजमानपद मिळाल्याचा आनंद साजरा होत असताना, भारताने मात्र यापासून अंतर राखले आहे. सेठ फ्रँट्झमन स्पष्ट करतात की, “भारत या चर्चेत नाही, कारण भारताला त्याची गरजच नाही.” भारत आज ‘क्वाड’ (Quad) आणि ‘आयएमईसी’ (IMEC) सारख्या जागतिक प्रकल्पांमध्ये प्रमुख भूमिका बजावत आहे. भारताचा प्रभाव इतका मोठा आहे की, इस्लामाबादमधील चर्चेत सहभागी न झाल्यामुळे भारताचे कोणतेही नुकसान होणार नाही. भारतासाठी या वादात अडकणे तर्कसंगत नाही, कारण भारत भविष्यातील अधिक महत्त्वाच्या आणि निर्णायक जागतिक मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रित करत आहे.
Is India missing out in regards to Pakistan hosting the Iran talks? I don’t think so. Pakistan is well
Positioned for these talks. It has close ties to the US, Saudi Arabia, the US and China; and a border with Iran (Baluchistan is important for Pakistan due to an insurgency).… — Seth Frantzman (@sfrantzman) April 10, 2026
credit – social media and Twitter
इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची आणि गालिबाफ यांच्या नेतृत्वाखाली तब्बल ७० सदस्यांचे शिष्टमंडळ इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहे. यामध्ये केवळ राजकारणीच नाहीत, तर आर्थिक आणि सुरक्षा क्षेत्रातील तंत्रज्ञांचाही समावेश आहे. इराणने चर्चेसाठी काही कडक अटी ठेवल्या आहेत, ज्यात लेबनॉनमधील युद्धविराम आणि अमेरिकेने गोठवलेली इराणची मालमत्ता मुक्त करणे यांचा समावेश आहे. इराणला माहित आहे की, हा करार त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वाचा आहे, परंतु ते आपल्या अटींशी तडजोड करण्यास तयार दिसत नाहीत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Islamabad Peace Talks : ‘अमेरिकेने पाठीत खंजीर खुपसला!’ इस्लामाबादमध्ये उतरताच गालिबाफ यांची जुन्या जखमांची उकल
डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेपूर्वीच आपले इरादे स्पष्ट केले आहेत. जर इराणने या बैठकीत ठोस करारावर स्वाक्षरी केली नाही, तर अमेरिका पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेईल आणि नवे हल्ले करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान या दोन टोकाच्या भूमिकांमध्ये मध्यस्थी कशी करतो, यावर सर्व काही अवलंबून आहे. पाकिस्तानला काही प्रमाणात जागतिक मान्यता मिळत असली, तरी या चर्चेचा शेवट काय होतो, यावरच त्यांचे भविष्य ठरेल. भारतासाठी मात्र, ही चर्चा म्हणजे केवळ एक प्रादेशिक घडामोड आहे, ज्याचा त्यांच्या जागतिक वाढीवर कोणताही परिणाम होणार नाही.
Ans: तज्ज्ञांच्या मते, भारत एक जागतिक महाशक्ती आहे आणि अशा प्रादेशिक चर्चेत सहभागी न झाल्याने भारताच्या प्रभावावर कोणताही परिणाम होत नाही; भारत मोठ्या जागतिक प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करत आहे.
Ans: गेल्या १० वर्षांपासून राजकीयदृष्ट्या एकाकी पडलेल्या पाकिस्तानला या चर्चेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा आपली विश्वासार्हता निर्माण करायची आहे.
Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, जर इराणने या चर्चेत कराराला सहमती दर्शवली नाही, तर अमेरिका इराणवर नवीन हल्ले करण्यास मागे-पुढे पाहणार नाही.