Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्याला इस्रायल-हमास सहमत; पंतप्रधान मोदींनीही केलं स्वागत, म्हणाले..

Israel-Hamas Peace Plan: अखेर गाझातील विनाश थांबणार. अमेरिकेच्या मध्यस्थीने इस्रायल आणि हमासमध्ये युद्धबंदी होणार आहे. ट्रम्प यांच्या गाझा योजनेला दोघांनी सहमती दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 09, 2025 | 10:53 AM
Donald Trump News:

Donald Trump News:

Follow Us
Follow Us:
  • इस्रायल हमासने ट्रम्प यांच्या शांतता योजनेला दिली सहमती
  • पहिल्या टप्प्यात युद्ध थांबवणे आणि ओलिसांची सुटका होणार
  • पंतप्रधान मोदींनी केले इस्रायल-हमासच्या निर्णयाचे स्वागत
Israel Hamas War : इस्रायल आणि हमास युद्ध (Isreal Hamas War) अखेर संपणार आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने गाझातील शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर इस्रायल आणि हमास सहमत झाला असल्याची घोषणा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केली आहे. गाझातील  युद्ध थांबवणे आणि ओलिसांची सुटका या पहिल्या टप्प्यात केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

हमासच्या अस्तित्वाला धोका? डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटींवर गाझात होणार का युद्धबंदी?

ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर पोस्ट केली आहे की, मला हे सांगताना खूप अभिमान वाटत आहे, इस्रायल आणि हमास दोघांनी आमच्या शांतता योजनच्या पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे आता लवकरच ओलिसांची सुटक होईल. इस्रायली सैन्य त्यांना मान्य करण्यात आलेल्या रेषेवरुन माघार घेईल. हे शांततेच्या दिशेने एक मोठे सकारात्मक पाऊल आहे.

हा दिवस अरब आणि मुस्लिम देशांसासाठी, इस्रायल, गाझा, आसपासचे सर्व राष्ट्र आणि अमेरिकेसाठी एक महान दिवस असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी कतार आणि तुर्कीने इस्रायल आणि हमासमध्ये मध्यस्थी करुन शांततेसाठी केलेल्या प्रयत्नांवरही आभार मानले आहे.

पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायल आणि हमासच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले की, हा निर्णय इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंच्या (Benjamin Netanyahu) मजबूत नेतृत्त्वाचा विजय आहे. आशा आहे की, गाझातील ओलिसांटी सुटका होईल. गाझातील लोकांना मानवतावादी मदत मिळेल आणि कायमस्वरुपी शांततेचा मार्ग देखील मोकळा होईल.

We welcome the agreement on the first phase of President Trump’s peace plan. This is also a reflection of the strong leadership of PM Netanyahu. We hope the release of hostages and enhanced humanitarian assistance to the people of Gaza will bring respite to them and pave the way… — Narendra Modi (@narendramodi) October 9, 2025

काय डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेचा पहिला टप्पा?

डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझात युद्धबंदीसाठी २० कलमी योजन मांडली होती. यातील पहिल्या टप्प्याला इस्रायल आणि हमासकडून मान्यता मिळाल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. याअंतर्गत इस्रायल गाझातून आपले सैन्य माघारी बोलावेल, तसेच ७२ तासांच्या आत हमास सर्व ओलिसांची सुटका करणार आहे. गुरुवारी (०९ ऑक्टोबर) रोजी इजिप्तमध्ये इस्रायल आणि हमासने या करारावर स्वाक्षरी केली आहे.

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न १. इस्रायल-हमास युद्धावर ट्रम्प यांनी काय घोषणा केली?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायल आणि हमासने त्यांच्या शांतता योजनेतील पहिल्या करारावर स्वाक्षरी केली असल्याचे घोषणा केली आहे.

प्रश्न २. पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या घोषणेवर काय म्हटले?

पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या घोषणेनंतर इस्रायल-हमासच्या शांतता योजेनला सहमती देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे ओलिसांची सुटका होईल आणि कायमस्वरुपी शांतात निर्माण होईल असे त्यांनी म्हटले आहे.

प्रश्न ३. शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यात कशावर लक्ष्य केंद्रित केले जाणार?

इस्रायल-हमासच्या सहमती नंतर शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यात गाझातील  युद्ध थांबवणे आणि ओलिसांची सुटका केली जाणार आहे.

Gaza War : इस्रायल गाझातील संघर्ष थांबवण्यास तयार? येत्या २४ तासांत ट्रम्प-नेतन्याहू करु शकतात युद्धबंदीची घोषणा

Web Title: Israel hamas agree on peace plan says donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 10:22 AM

Topics:  

  • Donald Trump
  • Israel Hamas War
  • World news

संबंधित बातम्या

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू
1

Sudan News : रक्तरंजित ड्रोन हल्ला ; सुदानमध्ये जनावरांच्या बाजारावर हल्ला ;३० जणांचा मृत्यू

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न
2

World News : फ्रान्समध्ये आंदोलनाचा भडका उडाला ; महापौर कार्यालयात घुसण्याचा आंदोलकांचा प्रयत्न

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा
3

US-Israel War : ‘अशी शक्ती बनू की शत्रू हल्ला करू शकणार नाही’; इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिका-इस्रायलला थेट इशारा

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?
4

Marco Rubio: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो 200 दिग्गज उद्योगपतींसह भारत दौऱ्यावर; मुंबई आणि जामनगरवरच का आहे मुख्य भर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.