Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

US-Israel Iran War: हिजबुल्लाहचा ‘राजकीय’ अंत! मोहम्मद राद इस्रायली हवाई हल्ल्यात ठार; IDFने प्रथमच केला ‘Iron beam’ने घातक प्रहार

US-Israel Iran War Live Updates: अमेरिका आणि इस्रायलने 28 फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ले केले, ज्यामध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांचा मृत्यू झाला. अमेरिका-इस्रायल इराण युद्धाचे लाईव्ह अपडेट्स

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 02, 2026 | 11:37 AM
israel kills hezbollah leader mohammad raad iron beam laser system first use us embassy pakistan

israel kills hezbollah leader mohammad raad iron beam laser system first use us embassy pakistan

Follow Us
Close
Follow Us:
  • हिजबुल्लाहला मोठा तडाखा
  • ‘आयर्न बीम’चा जगात पहिला वापर
  • पाकिस्तानात अमेरिकन दूतावास बंद

Mohammad Raad killed in Israeli strike : मध्यपूर्वेतील महायुद्ध आता एका अशा वळणावर आले आहे, जिथे विज्ञानातील काल्पनिक वाटणारी शस्त्रे प्रत्यक्षात कहर करत आहेत. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिकन-इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्यानंतर, आता इस्रायलने हिजबुल्लाहच्या राजकीय नेतृत्वाचा खात्मा करण्यास सुरुवात केली आहे. ताज्या वृत्तानुसार, हिजबुल्लाहच्या संसदीय गटाचा प्रमुख मोहम्मद राद (Mohammad Raad) हा इस्रायली हवाई हल्ल्यात ठार झाला आहे. सौदी वृत्तसंस्था अल-खदाथने याला दुजोरा दिला असून, यामुळे इराणच्या प्रॉक्सी गँगमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

‘आयर्न बीम’: लेझरने पाडले रॉकेट!

या युद्धातील सर्वात मोठी क्रांती म्हणजे इस्रायलची ‘Iron Beam’ ही लेझर संरक्षण प्रणाली. आजपर्यंत जगाने केवळ चित्रपटात लेझर गनने शत्रूचा नाश होताना पाहिले होते, परंतु इस्रायल डिफेन्स फोर्सेसने (IDF) उत्तर इस्रायलवर डागलेले हिजबुल्लाहचे रॉकेट्स आणि ड्रोन्स ‘आयर्न बीम’च्या मदतीने हवेतच जाळून खाक केले. ही प्रणाली ‘आयर्न डोम’पेक्षा कितीतरी पटीने स्वस्त आणि अचूक आहे. एका लेझर शॉटची किंमत अवघी काही डॉलर्स आहे, तर क्षेपणास्त्र रोखणाऱ्या एका इंटरसेप्टरची किंमत लाखात असते. इस्रायलने या शस्त्राचा वापर करून लष्करी इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Operation Epic Fury: युद्ध नाही, हा तर विनाश! अमेरिकेच्या ‘Scorpion Strike’ने आकाशातून पाठवले मृत्यूदूत,पहा ‘हा’ थरारक VIRAL VIDEO

पाकिस्तानात दहशतीचे वातावरण; अमेरिकन दूतावास बंद

इराणमधील घडामोडींचे सर्वात हिंसक पडसाद शेजारील देश पाकिस्तानात उमटत आहेत. खामेनींच्या हत्येचा निषेध करण्यासाठी कराची, लाहोर आणि इस्लामाबादमध्ये शिया समुदायाचे आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, अमेरिकन दूतावासाने आज, २ मार्च रोजी आपल्या सर्व व्हिसा अपॉइंटमेंट्स रद्द केल्या आहेत. अमेरिकन सरकारी कर्मचाऱ्यांच्या हालचालींवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, पेशावरमध्येही हिंसाचाराचा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तानमधील ही निदर्शने आता अमेरिका विरोधी उठावात रूपांतरित होताना दिसत आहेत.

Israel Assassinates Hezbollah parliamentary leader Mohammed Raad in Beirut — Al Arabiya pic.twitter.com/19B3Hq2GUb — RT_India (@RT_India_news) March 2, 2026

credit – social media and Twitter

इराणची हायपरसोनिक शस्त्रे आणि रशिया-चीनची साथ

खामेनींच्या मृत्यूनंतरही इराणचे लष्करी सामर्थ्य कमी झालेले नाही. इराणकडे ‘फतह’, ‘झुल्फिकार’ आणि ‘खोरमशहर’ सारख्या बॅलिस्टिक आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा प्रचंड साठा आहे. ही शस्त्रे रशिया आणि चीनच्या मदतीने विकसित करण्यात आली असून, ती कोणत्याही संरक्षण प्रणालीला भेदण्यास सक्षम आहेत. इराणने आधीच कतारमधील अमेरिकन तळांवर हल्ले केले असून, आता ते इस्रायलवर थेट हायपरसोनिक हल्ला करण्याची तयारी करत असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: Israel-Iran युद्धाचा ‘रिमोट कंट्रोल’ भारताच्या हातात? S. Jaishankar यांच्या ‘एका’ फोनने तेल अवीव ते तेहरानपर्यंत खळबळ

ट्रम्प यांचा दावा आणि चर्चेची शक्यता

दुसरीकडे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणच्या नवीन नेतृत्वाने पडद्यामागून चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत इराणचे दहशतवादी जाळे पूर्णपणे नष्ट होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहतील. इस्रायलने लेबनॉनमध्ये एकाच रात्री १० पेक्षा जास्त ठिकाणी हल्ले करून हिजबुल्लाहच्या वरिष्ठ नेत्यांना टार्गेट केले आहे, ज्यामुळे संपूर्ण मध्यपूर्वेत युद्धबंदीची शक्यता सध्या तरी मावळली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: इस्रायलची 'Iron Beam' लेझर प्रणाली काय आहे?

    Ans: ही एक हाय-पॉवर लेझर डिफेन्स सिस्टीम आहे, जी रॉकेट्स, ड्रोन्स आणि मॉर्टर्सना प्रकाशाच्या वेगाने (लेझरने) हवेतच नष्ट करते.

  • Que: मोहम्मद राद कोण होता आणि त्याच्या मृत्यूचे महत्त्व काय?

    Ans: मोहम्मद राद हा हिजबुल्लाहच्या संसदीय गटाचा प्रमुख होता. त्याचा मृत्यू हिजबुल्लाहच्या राजकीय आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रियेसाठी मोठा धक्का आहे.

  • Que: पाकिस्तानात अमेरिकन दूतावास का बंद करण्यात आले आहे?

    Ans: अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर पाकिस्तानातील प्रमुख शहरांमध्ये हिंसक अमेरिका विरोधी निदर्शने सुरू झाल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास बंद केले आहे.

Web Title: Israel kills hezbollah leader mohammad raad iron beam laser system first use us embassy pakistan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2026 | 11:37 AM

Topics:  

  • America
  • Hezbollah
  • Israel Iran war
  • World War 3

संबंधित बातम्या

Iran-Israel war Impact on India: इराण युद्धाचा भारतावर परिणाम; ऊर्जा आणि निर्यात क्षेत्रावर दबाव वाढण्याची शक्यता
1

Iran-Israel war Impact on India: इराण युद्धाचा भारतावर परिणाम; ऊर्जा आणि निर्यात क्षेत्रावर दबाव वाढण्याची शक्यता

World War 3: सायप्रस ते इस्रायल धुरांचे लोट! इराणच्या ‘प्रतिनिधी’ गॅंगने जगाला वेढलं; सायप्रसमधील UK हवाई तळांवरही ड्रोन हल्ले
2

World War 3: सायप्रस ते इस्रायल धुरांचे लोट! इराणच्या ‘प्रतिनिधी’ गॅंगने जगाला वेढलं; सायप्रसमधील UK हवाई तळांवरही ड्रोन हल्ले

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?
3

Middle East Crisis : इराण धुमसणार! ट्रम्प यांनी आखला विनाशाचा ‘आराखडा’; ५ आठवडे चालणार संघर्ष?

Noor Khan Airbase: पाकिस्तानमध्ये आणीबाणी! Pakistan हवाई दलाचा प्रमुख हवाई तळ जाळून खाक; तालिबानचा सर्वात मोठा प्रहार
4

Noor Khan Airbase: पाकिस्तानमध्ये आणीबाणी! Pakistan हवाई दलाचा प्रमुख हवाई तळ जाळून खाक; तालिबानचा सर्वात मोठा प्रहार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.