युद्धबंदी दरम्यान इस्रायलने 'आयरन वॉल' ऑपरेशन केले सुरू; वेस्ट बँकमध्ये तणाव वाढला, आतापर्यंत 10 पॅलेस्टिनी ठार ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
जेरुसलेम : गाझामध्ये नुकत्याच लागू झालेल्या युद्धविरामानंतर दोन दिवसांनी इस्रायलने वेस्ट बँकमधील जेनिन कॅम्पमध्ये मोठी लष्करी कारवाई सुरू केली आहे. ‘लोहाची भिंत’ नावाच्या या कारवाईत इस्रायली सैन्याने आतापर्यंत 10 पॅलेस्टिनींना ठार केले आहे, तर 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या ऑपरेशनचे वर्णन ‘दहशतवादाचा खात्मा’ करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून केले आहे.
पंतप्रधान नेतन्याहू यांच्या मते, ‘लोहाची भिंत’ ऑपरेशनचा उद्देश जेनिनमधील दहशतवाद संपवणे हा आहे. या ऑपरेशनमध्ये इस्रायली आर्मी, पोलीस आणि सुरक्षा एजन्सी शिन पेट यांचा सहभाग आहे. वेस्ट बँकमध्ये वाढता तणाव आणि दहशतवादी कारवाया पाहता ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.
हमास आणि इस्लामिक जिहादची प्रतिक्रिया
हमासने वेस्ट बँकमधील लोकांना आणि क्रांतिकारी तरुणांना इस्रायली मोहिमेविरुद्ध संघटित होऊन संघर्ष वाढविण्याचे आवाहन केले आहे. इस्लामिक जिहादची सशस्त्र शाखा अल कुद्स ब्रिगेडने देखील इस्रायली सैनिकांवर गोळीबार केल्याची पुष्टी केली आणि वेस्ट बँकमधील इस्रायली मोहिमेला विरोध करण्याचे आवाहन केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अंमली पदार्थ बनवण्याचे काम नग्नावस्थेतच का केले जाते? जाणून घ्या यामागे नेमके काय आहे मोठे कारण
जेनिन कॅम्पवर इस्रायली बॉम्बहल्ला
पॅलेस्टिनी न्यूज एजन्सी वाफाने दिलेल्या माहितीनुसार, इस्रायली विमानांनी जेनिनवर बॉम्बफेक केली आणि शरणार्थी छावणीला चिलखती वाहनांनी वेढा घातला. रुग्णवाहिकांना छावणीत जाण्यापासून रोखले जात असल्याचे स्थानिक अहवालात म्हटले आहे. जेनिनमध्ये चिलखती वाहने आणि बुलडोझरची जोरदार तैनाती दिसून आली आहे.
इस्रायलच्या कारवाईत 10 ठार
पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या लष्करी कारवाईत आतापर्यंत 10 जण ठार झाले असून त्यात 9 पुरुष आणि एका किशोरवयीन मुलाचा समावेश आहे. या हल्ल्यात 40 जण जखमी झाले असून, त्यामुळे परिसरात तणाव आणखी वाढला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : रशियाचे रडार बनणार भारताचे नवे ‘सेन्टीनल’; 8000 किमी अंतरावरूनही धोका, शत्रूवर ठेवणार करडी नजर
वेस्ट बँक मध्ये वाढता संघर्ष
गाझामध्ये नुकत्याच झालेल्या युद्धविरामानंतरही ‘आयर्न वॉल’ ऑपरेशनमुळे वेस्ट बँकमधील परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधील संघर्षाने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले आहे. ही लष्करी कारवाई जसजशी पुढे जाईल तसतशी पश्चिम किनाऱ्यातील परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होऊ शकते.