फोटो सौजन्य: सोशल मीडिया
लंडन: यूकेच्या नवीन सॅक्सवर्ड स्पेसपोर्टवर एक मोठी दुर्घटना घडली आहे. जर्मन कंपनी रॉकेट फॅक्टरी ऑग्सबर्ग (RFA) च्या नऊ इंजिनांच्या रॉकेटचा चाचणी असताना रॉकेट प्रक्षेपणानंतर काही सेकंदात स्फोट झाला. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. रॉकेटच्या खालच्या भागातून आगीचे मोठे लोट आणि धूर बाहेर येताना दिसले, त्यामुळे संपूर्ण रॉकेट आगीच्या ज्वाळांनी जळून खाक झाले.
मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. लॉन्चपॅडही सुरक्षित आहे. RFA ने याचे वर्णन “तांत्रिक त्रुटी” म्हणून केले आणि सांगितले की या घटनेची संपूर्ण चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की त्यांचे चाचणी मॉडेल वास्तविक चाचण्यांवर आधारित आहे, त्यामुळे असे धोके होण्यार हे त्यांना माहित होते. आरएफए शक्य तितक्या लवकर पुन्हा एकदा मिशन पूर्ण करण्यासाठी लक्ष देत आहे. या अपघातानंतर आता आरएफएच्या पुढील तयारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सॅक्सवर्ड स्पेसपोर्टवर मोठा स्फोट
हा अपघात यूकेच्या शेटलँड बेटांमधील सॅक्सवर्ड स्पेसपोर्टवर झाला. जेथे जर्मन कंपनी रॉकेट फॅक्टरी ऑग्सबर्ग (RFA) द्वारे चाचणी प्रक्षेपण केले जात होते. नऊ इंजिनांच्या या रॉकेटचा चाचणीदरम्यान स्फोट झाला. या घटनेचे फोटो देखील समोर आले आहेत. घटनेच्या फोटोंमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे की रॉकेटच्या खालच्या भागातून आग आणि धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते, जे संपूर्ण रॉकेटला वेढत होते.
Meanwhile in Shetland…
Thankfully no one was hurt. This is why there are tests! I’m sure Rocket Factory Augsburg (RFA) will come back stronger.
RFA experienced a failure while testing the first-stage engine for its RFA ONE launch vehicle at Saxavord Spaceport in Scotland. pic.twitter.com/9RpamPIxaB
— Ellie in Space 🚀💫 (@esherifftv) August 20, 2024
तांत्रिक बिघाड
या घटनेनंतर, आरएफएने सांगितले की रॉकेटच्या पहिल्या टप्प्याच्या चाचणी दरम्यान “तांत्रिक बिघाड” मुळे रॉकेटचा स्फोट झाला. मात्र, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, तसेच लॉन्चपॅडचेही मोठे नुकसान झाले नाही. आरएफएच्या प्रवक्त्यानुसार, “लाँचपॅड सुरक्षित आहे आणि संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे. सध्या कोणताही धोका नाही.” कंपनीने असेही सांगितले की ते शक्य तितक्या लवकर नियमित कामकाजावर परतण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि या घटनेची कसून चौकशी केली जात आहे.
सॅक्सवर्ड स्पेसपोर्टचे विधान
या घटनेवर भाष्य करताना, सॅक्सवर्ड स्पेसपोर्टच्या प्रवक्त्याने सांगितले, ‘ही एक चाचणी होती आणि चाचणीचा उद्देश कोणत्याही संभाव्य समस्या ओळखणे हा आहे. या घटनेतून शिकण्यासाठी आम्ही RFA सोबत काम करू आणि पुढील टप्प्याच्या तयारीसाठी त्यांना पाठिंबा देऊ.’ या घटनेकडे अयशस्वी चाचणी म्हणून पाहिले जात असले तरी भविष्यासाठी हा एक महत्त्वाचा धडा आहे. अवकाश उद्योगात अशा घटना सर्रास घडतात आणि RFA सारख्या कंपन्या यातून धडा घेतील आणि त्यांची प्रणाली सुधारतील. आता आरएफए आपली तयारी कशी पुढे नेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.