वॉशिंग्टन : टायटॅनिक जहाजाचे (Titanic Ship) अवशेष पाहण्यासाठी गेलेली टायटन पाणबुडी (Titan Submarine) समुद्रात बुडाली. यामध्ये 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाला. ही पाणबुडी ओशिन गेट या कंपनीची असून, ती 22 फुटांची होती. या पाणबुडीत असलेल्या अब्जाधीशांचा मृत्यू किती भयंकर होता याची कल्पनाही आपण करु शकत नाही. पण, टायटॅनिक जहाज 1912 मध्ये बुडाले. या अपघातात 1500 पेक्षा जास्त लोकांचा बुडून मृत्यू झाला होता. या अपघातामागे ‘द ममीचा शाप’ असल्याचे म्हटले जात आहे.
या सिद्धांतानुसार, टायटॅनिक जहाज जेव्हा इंग्लंडहून न्यूयॉर्कसाठी निघाले, तेव्हा त्यावर एक शापित ममीचे ग्रहण लागले होते. या ममीच्या शापामुळे टायटॅनिक जहाजाला अपघात झाला आणि ते बुडाले, असे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या सिद्धांतानुसार, हे जहाज मुद्दामहून बुडवण्यात आल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये बँकर जेपी मॉर्गन याचा हात असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. मॉर्गन याला त्याचे प्रतिस्पर्धी करोडपती संपवायचे होते. जेकब अॅस्टर, बेंजामिन गुगेनहेम आणि इसिडोर स्ट्रॉस हे त्याचे प्रतिस्पर्धी होते. टायटॅनिक जहाज जेव्हा जात होते तेव्हा त्यामध्ये हे तिघेही होते. त्यात तिघांचाही मृत्यू झाला.
टायटॅनिक कधीच बुडाले नव्हते
या जहाजाच्या कंपनीने टायटॅनिकसारखेच दिसणारे ऑलिम्पिक जहाज तयार केले होते. त्यात त्याची आदलाबदली झाली. फक्त ते टायटॅनिकसारखे दिसणारे जहाज होते. सिद्धांतानुसार कंपनीला ऑलिम्पिक जहाज नको होते आणि विम्याचे पैसेही हवे होते. त्यामुळे टायटॅनिकऐवजी ऑलिम्पिक बुडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, टायटॅनिकच पाण्यात बुडाले असे पुरावे आज स्पष्टपणे उपलब्ध आहेत.
टायटॅनिक नेमके बुडाले कसे?
टायटॅनिक एका अपघातामुळे बुडाल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जहाज एका बर्फाळ खडकावर आदळले होते. या धडकेनंतर जहाजाच्या आत पाणी शिरू लागले. टायटॅनिक जहाज समुद्रात सरळ उभे राहिले आणि नंतर त्याचे दोन तुकडे झाले. अपघाताच्या 73 वर्षांनंतर 1985 मध्ये कॅनडातील न्यूफाउंडलँडजवळील समुद्रात त्याचा शोध लागला.