फोटो सौजन्य- iStock
15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य झालो. प्रत्येक भारतीयांसाठी हा दिवस सोनेरी दिवस आहे. त्यामुळे आपण सर्वच तो उत्साहात साजरा करतो. जगाच्या इतिहासामध्ये पाहिल्यास 15 ऑगस्टला आपल्या देशासोबतच अनेक देशांनाही या दिवशी स्वातंत्र्य मिळाले. त्यांनीही या स्वातंत्र्यासाठी लढा दिला जाणून घेऊया या देशांविषयी.
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया हे दोन्ही देश 15 ऑगस्ट हा त्यांचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतात. जपानच्या राजवटीमधून कोरिया देशाला स्वातंत्र्य मिळाले पुढे हे दोन्ही देश वेगवगेळे झाले. आज दक्षिण कोरिया इलेक्ट्रॉनिक सेक्टरचे हब आहे. उत्तर कोरियामध्ये हुकुमशाह किंम जॉन याची राजवट आहे.
कॉंगो (Democratic Republic of the Congo )
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रेंच राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवले. हा दिवस काँगोचा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो, या दिवशी कॉंगोमधून फेंचांच्या 80 वर्षांच्या राजवटीचा अंत झाला. लोकशाही प्रजासत्ताक कॉंगो हा आफ्रिकन देश तेथील खनीज संपत्तीसाठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकांच्या रेन फोरेस्टसाठी ओळखला जातो.
बहारीन
बहारीन हे पर्शियन गल्फमधील एक बेट राष्ट्र आहे. बहारीन देशसुध्दा ब्रिटीशांच्या नियंत्रणाखाली होता. या देशाला 15 ऑगस्ट 1971 रोजी स्वातंत्र्य मिळाले. हा देश इतर अरब देशांप्रमाणे तेथील इंधनसंपत्तीसाठी ओळखला जातो.
लिकटेंस्टीन- एक लहान पण श्रीमंत राष्ट्र
जगातील सर्वात लहान आणि श्रीमंत देशांपैकी एक लिकटेंस्टीन अधिकृतपणे 15 ऑगस्ट रोजी त्याचा राष्ट्रीय दिवस साजरा करतो. देशाला 1866 मध्ये जर्मन राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1940 मध्ये 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. या देशाची केवळ 39,327 इतकी लोकसंख्या आहे.
20 व्या शतकात जगातील तब्बल 70 हून जास्त देशांवर ब्रिटीशांची सत्ता होती. बहुतांश देशांना ब्रिटीशांच्या राजवटीमधून दुसऱ्या महायुध्दानंतर स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटीशांसोबतच फ्रेंच, स्पेनीश, पोर्तुगीज यांच्याही अनेक देशांवर सत्ता होत्या त्या देशांनीही गेल्या शतकात संघर्ष करुन स्वातंत्र्य प्राप्त केले आहे. आज संयुक्त राष्ट्र संघामध्ये तब्बल 193 देश आहेत.