अमेरिकेचे मिशन पूर्ण! जगातील 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्याचा इराकमध्ये खात्मा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बगदाद: जगातील सर्वात धोकादायक दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. इस्लामिक स्टेट (ISIS) चा प्रमुख आणि सर्वात धोकादायक आंतकवादी अबू खादिजा म्हणून ओळखला जाणारा अब्दुल्ला मक्की मुसलिह अल-रुफई इराकमध्ये मारला गेला आहे. इराकचे पंतप्रधाम मोहम्मद शिय अल-सुदानी यांनी ही माहिती दिली. इराक आणि अमेरिकेने मिळून याचा खात्मा करण्याचे मिशन हाती घेतले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, आमच्या शूर योद्धानी त्यांना शोधले आणि त्यांच्या खात्मा केला.
ट्रम्प यांंनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले की, आज इराकमध्ये फरार दहशतवादी आणि ISIS चा प्रमुख नेता अबू खादिजा याचा खात्मा करण्यात आला. आमच्या शूर युद्धसैनिकांनी त्याला बिळातून बाहरे काढले आणि इराक सरकार आणि कुर्दिश प्रादेशिक सरकारच्या सहमतीने त्याला ठार करण्यात आले.
CENTCOM Forces Kill ISIS Chief of Global Operations Who Also Served as ISIS #2
On March 13, U.S. Central Command forces, in cooperation with Iraqi Intelligence and Security Forces, conducted a precision airstrike in Al Anbar Province, Iraq, that killed the Global ISIS #2 leader,… pic.twitter.com/rWeEoUY7Lw
— U.S. Central Command (@CENTCOM) March 15, 2025
इराक पंतप्रधानांनी शांतताप्रेमी देशांचे अभिनंदन केले
इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी आतंकवादी अबू खादिजाच्या हत्येनंतर म्हटले की, ” ISIS चा प्रमुख आणि जगातील मोस्ट वान्टेड दहशतवादी म्हणून अबू खादिजाला ओळखले जाते. आज त्याचा खात्मा करण्यात आला. या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल मी इराक, इराकी जनता आणि सर्व शांतताप्रेमी देशांचे अभिनंदन करतो.
يواصل العراقيون انتصاراتهم المبهرة على قوى الظلام والإرهاب، حيث تمكن أبطال جهاز المخابرات الوطني العراقي، بإسناد وتنسيق من قيادة العمليات المشتركة وقوات التحالف الدولي، من قتل الإرهابي عبد الله مكي مصلح الرفيعي المكنى (أبو خديجة) الذي يشغل منصب ما يسمّى (نائب الخليفة وهو الذي…
— محمد شياع السوداني (@mohamedshia) March 14, 2025
अशी करण्यात आली हत्या
अबू खादिजाचा जन्म 1991 मध्ये इराकमधील सलाहुद्दीन प्रांतात झाला होता. इराक आणि जगातील मोस्ट वॉन्टेड म्हणून त्याला ओळखले जात होता. अबू खादिजा ISIS च्या इराक आणि सीरियामधील दहशतवादी गटांचा प्रमुख होता. 2023 मध्ये अमेरिकेने जगातील दहशतवादी म्हणून अबू खादिजाला घोषित केले आणि त्याच्यावर बंदी घातली होती. इराक सैन्य आणि अमेरिकन सैन्याने संयुक्तपण लष्करी कारवाई करत अनबार प्रांतातील लफून बसलेल्या खादिजावर हवाई हल्ला सुरु केला. या हवाई हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.