Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

War Crimes : इस्रायलने मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या! चिमुकल्यांच्या रुग्णालयाची राखरांगोळी; इराणने जारी केला भयावह VIDEO

Roman Gofman : इराणने तेहरानमधील महात्मा गांधी रुग्णालयावर झालेल्या इस्रायली हल्ल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. मुलांवरील उपचारांसाठी प्रसिद्ध असलेले हे रुग्णालय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 13, 2026 | 02:24 PM
mahatma gandhi hospital tehran destroyed israel airstrike children hospital video 2026

mahatma gandhi hospital tehran destroyed israel airstrike children hospital video 2026

Follow Us
Follow Us:
  • शांततेच्या प्रतीकावरच हल्ला
  • WHO कडून हल्ल्याची पुष्टी
  • परस्परविरोधी दावे

Mahatma Gandhi Hospital Tehran destroyed : युद्ध कोणत्याही देशाचे असो, त्यात सर्वाधिक किंमत निष्पाप जनतेला आणि लहान मुलांनाच चुकवावी लागते, हेच त्रिकालबाधित सत्य आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या भयंकर संघर्षाने आता मानवतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. इराणची राजधानी तेहरानमधून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. लहान मुलांच्या उपचारांसाठी संपूर्ण इराणमध्ये प्रसिद्ध असलेले आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव दिलेले ‘महात्मा गांधी रुग्णालय’ (Mahatma Gandhi Hospital) इस्रायलच्या विनाशकारी हवाई हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ नुकताच इराणने जारी केला असून, ढिगाऱ्याखाली दबलेल्या व्हीलचेअर्स आणि उद्ध्वस्त झालेल्या इमारती पाहून संपूर्ण जग हादरले आहे.

शांततेच्या प्रतीकाचीच राखरांगोळी; काय आहे रुग्णालयाचा इतिहास?

ज्या महात्म्याने संपूर्ण जगाला शांतता आणि अहिंसेचा संदेश दिला, त्याच महात्मा गांधींच्या नावावर असलेल्या रुग्णालयावर बॉम्बगोळे पडणे, हा नियतीचा क्रूर विनोदच म्हणावा लागेल. हे रुग्णालय तेहरानमधील ‘गांधी रोड’वर (Gandhi Street) स्थित होते. २००८ ते २००९ च्या दरम्यान इराणी डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या एका गटाने मिळून या अत्याधुनिक वैद्यकीय संकुलाची उभारणी केली होती. भारत आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक सांस्कृतिक संबंध आणि गांधीजींच्या तत्त्वांविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी या रुग्णालयाला आणि रस्त्याला महात्मा गांधींचे नाव देण्यात आले होते. मात्र, आज हेच शांततेचे प्रतीक युद्धाच्या ज्वालांमध्ये भस्मसात झाले आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Oil Price Hike: ‘पेट्रोलच्या किमती विसरू नका!’ ट्रम्प यांच्या नाकेबंदीला इराणचे ‘गणितीय’ उत्तर; अमेरिकेला रडवणारं समीकरण VIRAL

व्हिडिओमध्ये दिसला विध्वंसाचा थरार!

भारतातील इराणी दूतावासाने (Iranian Embassy in India) या हल्ल्यानंतरच्या भयंकर परिस्थितीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फुटेजमध्ये दिसते की, एकेकाळी जिथे लहान मुलांचे हसणे आणि डॉक्टरांची लगबग असायची, तिथे आता फक्त धूळ, ढिगारा आणि रक्ताचे डाग उरले आहेत. छताचे मोठे तुकडे खाली कोसळले आहेत, वैद्यकीय उपकरणे तुटून पडली आहेत आणि एका तुटलेल्या व्हीलचेअरभोवती पसरलेला ढिगारा युद्धाची भीषणता सांगण्यासाठी पुरेसा आहे. स्थानिक प्रत्यक्षदर्शींच्या मते, हा हल्ला इतका भीषण होता की संपूर्ण परिसर हादरून गेला होता.

Mahatma Gandhi Hospital, Tehran. pic.twitter.com/NpvbmN32sR — Iran in India (@Iran_in_India) April 12, 2026

credit – social media and Twitter

जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) अत्यंत महत्त्वाची पुष्टी

ही केवळ इराणची अफवा नाही, तर ‘जागतिक आरोग्य संघटने’ने (WHO) स्वतः या घटनेला दुजोरा दिला आहे. रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २ मार्च रोजी इस्रायलने केलेल्या थेट हवाई हल्ल्यात (Airstrike) या रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले. सुदैवाने, हल्ल्यानंतर त्वरित बचावकार्य राबवत रुग्णांना आणि चिमुकल्यांना बाहेर काढण्यात आले, असे WHO ने स्पष्ट केले आहे. मात्र, या हल्ल्यामुळे आजारी मुलांच्या उपचारांमध्ये मोठी बाधा निर्माण झाली आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Nepal Economy : चीनच्या मैत्रीचा नेपाळला बसला 50 अब्ज रुपयांचा फटका! वाचा 5 वर्षांपासून धूळ खाणाऱ्या विमानांचे ‘शॉकिंग’ सत्य

इराणचा संताप आणि इस्रायलचा धक्कादायक दावा

या हल्ल्यानंतर जागतिक स्तरावर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. इराणने अत्यंत संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “गेल्या ४० दिवसांच्या युद्धात आम्ही कधीही रुग्णालये किंवा लहान मुलांना लक्ष्य केले नाही. ही आमची युद्धनीती नाही. पण दुसरीकडे इस्रायल आणि अमेरिकेने आतापर्यंत ६०० हून अधिक रुग्णालये आणि ६० हून अधिक शाळांना उद्ध्वस्त करून युद्धगुन्हे केले आहेत.”

या उलट, इस्रायलने या हल्ल्याचे थेट समर्थन केले आहे. इस्रायली संरक्षण दलाचा (IDF) दावा आहे की, इराण आणि त्यांचे समर्थक दहशतवादी गट मुद्दाम शाळा आणि वैद्यकीय सुविधांचा वापर ‘लष्करी तळ’ (Military Bases) आणि शस्त्रे लपवण्यासाठी करतात. रुग्णालयांच्या आडून इस्रायलवर हल्ले केले जात असल्यामुळे नाईलाजाने ही कारवाई करावी लागली, असा युक्तिवाद इस्रायलकडून वारंवार केला जात आहे.

मानवतेपुढील सर्वात मोठे संकट!

कारणे काहीही असली, तरी सत्य हेच आहे की एका युद्धाच्या वेडेपणात मानवतेचा गळा घोटला जात आहे. महात्मा गांधी रुग्णालय हे केवळ एक इमारत नव्हते, तर हजारो आजारी बालकांसाठी ते एक आशेचे किरण होते. इस्रायल आणि इराणच्या या राजकीय आणि लष्करी संघर्षात आता लहान रुग्णालये आणि नागरी वस्त्याही सुरक्षित राहिलेल्या नाहीत. हा संघर्ष असाच सुरू राहिला, तर मध्य-पूर्वेत केवळ ढिगारे आणि विलापच उरतील, अशी भीती आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना व्यक्त करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महात्मा गांधी रुग्णालय कुठे आहे आणि ते कशासाठी प्रसिद्ध होते?

    Ans: हे रुग्णालय इराणची राजधानी तेहरानमधील 'गांधी रोड'वर आहे आणि ते लहान मुलांवरील विशेष उपचारांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध होते.

  • Que: रुग्णालयावरील हल्ल्याबाबत 'WHO' ने काय म्हटले आहे?

    Ans: जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुष्टी केली आहे की, २ मार्च रोजी झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात हे रुग्णालय उद्ध्वस्त झाले असून रुग्णांना तातडीने बाहेर काढण्यात आले.

  • Que: रुग्णालयावर हल्ला करण्यामागे इस्रायलने कोणते कारण दिले आहे?

    Ans: इस्रायलचा दावा आहे की, इराण आणि संबंधित दहशतवादी गट वैद्यकीय सुविधांचा वापर लष्करी तळ म्हणून आणि शस्त्रे लपवण्यासाठी करतात, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

Web Title: Mahatma gandhi hospital tehran destroyed israel airstrike children hospital video 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • Iran Attack
  • Israel
  • Video Viral
  • World news

संबंधित बातम्या

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार
1

Greece-Israel Deal : ग्रीसची आकाशाला ‘लोखंडी ढाल’; इस्रायलसोबत ३.५ अब्ज डॉलरचा करार

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात
2

Gaza War : ‘नेतान्याहू मानवतेचे शत्रू’; तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांचा घणाघात

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा
3

China War Law: चीनमधील AI आणि ड्रोन कंपन्या आता सैन्याच्या दावणीला; नव्या कायद्याने जगात खळबळ; भारतासाठी धोक्याची घंटा

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा
4

PM Modi : ताश्कंदमध्ये पंतप्रधान मोदींकडून महान तमिळ ग्रंथ ‘तिरुक्कुरळ’चा विशेष गौरव; उझबेक विद्यार्थ्यांसाठी केली मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.