मार्क झुकरबर्क रुग्णालयात दाखल; पायाला दुखापत, मार्शल आर्टची प्रॅक्टिस करताना दुर्घटना!

मार्कने त्याच्या सोशल मीडिया अंकाऊटवरुन त्याच्या हेल्थबाबत माहिती दिली. मार्कने सांगितले की, मार्शल आर्टची प्रॅक्टिस करताना माझ्या पायाची नस फाटल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया पार पडली.

  मार्क झुकरबर्गच (Mark Zuckerberg) नाव सध्या चर्चेत आहे. फेसबुकमुळे केलेल्या कोणत्याही बदलामुळे नाही तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो चर्चेत आहे. मार्क झुकरबर्गने रुग्णालयात दाखल असेलेला फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे. मार्कवर नुकतीच एक मोठी शस्त्रक्रिया पार पडली आहे. मार्शल आर्टच्या सरावादरम्यान त्याच्या पायाची पायाची नस फाटल्यामुळे (ACL) त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्याच्याफोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट केले असून त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

  काय झालं मार्क झुकरबर्गला?

  मार्कने त्याच्या सोशल मीडिया अंकाऊटवरुन त्याच्या हेल्थबाबत माहिती दिली. मार्कने सांगितले की, मार्शल आर्टची प्रॅक्टिस करताना माझ्या पायाची नस फाटल्यामुळे माझ्यावर शस्त्रक्रिया पार पडली. सर्जरीनंतर लिगामेंट बदलण्यात आली आहे. सर्व डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार.” “मी पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या MMA फाईटसाठी ट्रेनिंग घेत होतो. मात्र, आता ही फाईट पुढे ढकलावी लागणार आहे. अर्थात, पूर्णपणे बरा झाल्यानंतर नक्कीच मी यात सहभागी होईल. तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेम आणि आधारासाठी धन्यवाद.” असंही मार्क झुकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.

   

  युझर्सनी मार्कला दिल्या शुभेच्छा

  मार्कवर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती सोशल मीडियावरुन कळताच युझर्सनी त्याला लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक जणांनी कंमेट करुन त्याला त्याच्या प्रकृतिबद्दल विचारणा केली आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Mark Zuckerberg (@zuck)