भारत विरुद्ध इंग्लंड (फोटो- ट्विटर)
भारत याआधी आयर्लंडविरुद्ध दोन टी 20 सामने खेळून आला आहे. या सिरिजमध्ये भारताचा मालिका पराभव झाला आहे. त्यामुळे भारतासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये तरी वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे. दरम्यान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.
कोर्टाने अर्ज फेटाळला अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड?
इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माचा रेकॉर्ड चांगला असल्याचे पाहायला मिळतो. तो या सिरिजमध्ये देखील आपला रेकॉर्ड कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. या सिरिजमध्ये अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. त्याच्याकडे इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अभिषेक शर्माला केवळ 6 सिक्स मारण्याची गरज आहे. तसे करताच इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड अभिषेक शर्माच्या नावावर होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात आज भारत इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे.
IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?
पीच रिपोर्ट
चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये केवळ 3 संघ प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत. या स्टेडियमवर सर्वाधिक स्कोअर हा 135 ते 140 रन्सचा आहे.
भारतीय संघ: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…
इंग्लंडचा संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), फिल सॉल्ट, जोस बटलर, जॅकोब बेथेल, सॅम करन, विल जॅक्स, आदिल रशीद, ल्यूक वूड, साकिब महमूद, लियाम डॉसन, टॉम बँटन.






