Middle East Conflict : मध्यपूर्व हादरणार! इराणविरोधात हे १२ मुस्लिम देश एकटवले; विनाशाची उलची गिनती सुरु? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकी सौदी अरेबियासह, कतार, संयुक्त अरब अमिराती (UAE), कुवैत, बहरीन, इजिप्त, जॉर्डन, लेबनॉन, पाकिस्तान, तुर्की, सीरिया आणि अझरबैजान या देशांचे परराष्ट्र मंत्री सहभागी झाले होते. इराणने शेजारी देशांमध्ये तेल साठे, उर्जा केंद्र, रहिवासी भाग आणि विमानतळांना जाणीवपूर्वल टार्गेट केल्याचे या देशांचा आरोप आहे.
यामुळे ‘संयुक्त राष्ट्र चार्टरच्या कलम ५१’ अंतर्गत ‘आत्मरक्षणाचा अधिकार’ वापरण्याचे या देशांनी दिले आहेत. इराणच्या हल्ल्यांमुळे या प्रदेशातील उर्जा पुरवठा धोक्यात आला असून सामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याने या देशांनी संताप व्यक्त केला आहे.
या बैठकीत सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी इराणविरोधात कडक पवित्रा घेताल. त्यांनी इराणला रोखण्यासाठी आमच्याकडे अफाट शक्ती आहे आणि गरज पडल्यास आम्ही मागे हटणार नाही असे म्हटले. इराणवरील विश्वास आता ढासळला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या सौदीच्या या भूमिकेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दुसरीकडे इराणमध्ये नेतृत्त्वात बदल झाला आहे. सर्वोच्चे नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र मोजतबा खामेनेई नवे सुप्रीम लीडर बनले आहेत. यानंतर इराण (Iran) अधिक आक्रमक झाला आहे. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस ४ सुरु केले असून शेजारील देशांमध्ये तेल सुविधेवर हल्ले केले आहेत. यामुळे युद्धा आता एक नव्या वळणावर येऊन पोहोचले आहे.
सध्या सर्व मुस्लिम देश इराणविरोधात एकवटले असून लष्करी कारवाई करण्याचीही शक्यता आहे. यामुळे जागतिक स्तरावर गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
Ans: मध्यपूर्वेत आखाती देशांवर वाढत्या इराणच्या हल्ल्यांविरोधात एकत्रित भूमिका घेण्यासाठी आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीतीचा एक भाग म्हणून बैठक घेण्यात आली.
Ans: रियाधमध्ये झालेल्या बैठकीत सौदी अरेबिया, कतार, युएई, कुवैत, बहरीव, इजिप्त, जॉर्डन, लेबनॉन, पाकिस्तान, तुर्की, सीरिया, आणि अझरबैजान या १२ देशांनी सहभाग घेतला होता.
Ans: या बैठकीत इराणच्या अरब देशांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला असून UN चार्टरनुसार आत्मरक्षणाचा अधिकार वापरुन प्रत्युत्तर देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.






