US Iran War : इराणशी पंगा ट्रम्प यांना पडला भारी! मध्यपूर्वेतील १३ अमेरिकन लष्करी तळं उद्ध्वस्त, रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
अमेरिकेचे प्रसिद्ध वृत्तपक्ष द न्यूयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनी अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याला मोठा धक्का बसला आहे. इराणच्या हल्ल्यात मध्यपूर्वेतील तब्बल १३ अमेरिकन लष्करी तळे उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे अमेरिकेचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. या अहवालामने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
फेब्रुवारी २०२६ मध्ये इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई (Ayatollah Ali Khamenei) यांची झाली होती. यानंतर इराणने आक्रमक पवित्रा घेत ऑपरेशन ट्रुथफुल प्रॉमिस सुरु केले. इराणने थेट अमेरिकेविरोधात युद्ध पुकारत मध्यपूर्वेतील अमेरिकेन लष्करी तळे आणि दूतावासांना लक्ष्य केले होते.
इराणने सौदी अरेबिया, कुवैत, बहीरन, यूएई, येथील लष्करी तळांना आणि दूतावांसावर आत्मघाती ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्यांमध्ये अमेरिकन लष्करी तळांची राखरांगोळी झाली असून तिथे राहण्यायोग्य जागाही राहिली नाही.
अहवालानुसार, सर्वात जास्त नुकसान हे कुवैत आणि कतारमधील तळांचे झाले. इराणने अली अल सलेम एअर बेस, कॅम्प बुहरिंग आणि पोर्ट शुऐबा भीषण आणि अचूक प्रहार केला होता. इराणने या तळांवरील इंधन यंत्रणा, विमानांचे हँगर आणि दळणवळण केंद्रे उद्ध्वस्त केली. कतारमधील अल उदेद आणि युएईमधील अल धफ्रा एअर बेसलाही लक्ष्य करण्यात आले होते. या हल्ल्यांमुळे अमेरिकन सैन्याला लष्करी तळांऐवजी स्थानिक ठिकाणांमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, इराणच्या या विनाशकारी हल्ल्यांमुळे अमेरिकेचे अंदाजे ८०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. अनेक प्रगत रडार यंत्रणा निकामी झाल्या आहेत. यामुळे मध्यपूर्वेतील आखाती देशांमध्येही
तणावाचे वातावरण आहे.
US Iran War : अमेरिकेला शरण गेला इराण? ट्रम्प यांना थेट ‘सर्वोच्च नेता’ बनण्याची ऑफर, जगभरात खळबळ
Ans: अमेरिका-इस्रायलच्या इराणवर संयुक्त हल्ल्यानंतर आणि खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराण आक्रमक झाला होता. इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत मध्यपूर्वेतील लष्करी तळांना उद्ध्वस्त केले.
Ans: कुवैत, कतार, बहरीन, युएईमधील आणि सौदी अरेबियातील लष्करी तळांवर इराणने अभेद्य आणि अचूक हल्ले केले.
Ans: न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे की, इराणच्या या विनाशकारी हल्ल्यांमुळे अमेरिकेचे अंदाजे ८०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे.






