रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाला मोठा फटका (फोटो- सोशल मीडिया)
28 मार्चपासून सुरू होणार आयपीएलचा हंगाम
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना
नुवान तुषाराला मिळाली नाही एनओसी
IPL 2026: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला आयपीएलचा सामना 28 मार्चला होणार आहे. 28 मार्चपासून आयपीएलचा महाउत्सव सुरू होणार आहे. दरम्यान आयपीएल सुरू होण्याआधी बंगलोरच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. बंगलोरचा पहिला सामना एम. चिन्नास्वामी मैदानात होणार आहे. मात्र बंगलोर संघासाठी वाईट बातमी समोर आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना होणार आहे. त्याआधी बंगलोरच्या वेगवान गोलंदाज असलेल्या नुवान तुषाराला एनओसी मिळाली नसल्याचे समोर आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, श्रीलंका क्रिकेटने नुवान तुषाराला एनओसी सर्टिफिकेट दिले नसल्याचे समोर आले आहे.
श्रीलंका क्रिकेटने एक नवीन फिटनेस पॉलिसी जाहीर केली आहे. त्यामध्ये नुवान तुषाराने ती फिटनेस पॉलिसी क्लिअर केली नसल्याचे समजते आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डने नुवान तुषाराला एनओसी दिली नसल्याचे समोर येत आहे. टी-20 क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी क्लिअर करावी लागणारी टेस्ट नुवान तुषारा पार करू शकला नाही. ती टेस्ट क्लिअर केल्यावर नुवाण तुषाराला एनओसी मिळू शकते. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने नुवान तुषाराला 1.6 कोटींमध्ये रिटेन केले होते.
IPL 2026 मध्ये वेगवान घडामोडी! ऋषभ पंत LSG चा बॉस नसणार? संजीव गोयंकांच्या पोस्टने खळबळ…
ऋषभ पंत LSG चा बॉस नसणार?
येत्या शनिवारपासून आयपीएलचा नवा हंगाम सुरू होणार आहे. 28 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरू होणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध हैद्राबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. त्यातच आता एक महत्वाची बातमी समोर येत आहे. लखनौ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत असणार की नाही अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यातत आता संघाचे मालक संजीव गोयंकांनी केलेली पोस्ट व्हायरल होत आहे.
संजीव गोयंकांची पोस्ट काय?
आयपीएल हंगामाची सुरुवात होत असताना ऋषभ पंतच्या कर्णधारपदाबद्दल सुरू असलेल्या चर्चा मी वाचल्या आणि मला हसू फुटले. त्याचा स्वभाव आणि त्याची बांधिलकी जाणून घेण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ एकत्र घालवला आहे. हा सीझन तुझ्यासाठी जबरदस्त जावो, कॅप्टन.
RCB चे नाव बदलणार? अनन्या बिर्लांच्या ‘त्या’ उत्तराने सोशल मीडियावर IPL 2026 आधी खळबळ!
संजीव गोयंका यांनी केलेल्या पोस्टनुसार ऋषभ पंतच एलएसजीचा कर्णधार असणार आहे. मागील वर्ष ऋषभ पंतच्या नेतृत्वात एलएसजीचा संघ एकूण 14 सामने खेळला. यामध्ये 6 सामने त्याने जिंकले तर 8 मध्ये त्याला पराभवाचा सामना करावा लागला. थोडक्यात मागील हंगाम एलएसजीसाठी एवढा खास राहिला नाही.






