नोबेल पुरस्कार (Nobel Prize 2023) हा जगातील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक आहे. नुकतचं 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार इराणच्या मानवाधिकार कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी () यांना देण्यात आला आहे. इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवी हक्क आणि स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. याआधी गुरुवारी नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला.
2023 Nobel Peace Prize awarded to Narges Mohammadi for her fight against the oppression of women in Iran and her fight to promote human rights and freedom for all.
(Pic: Nobel Prize) pic.twitter.com/98WySrqnZi
— ANI (@ANI) October 6, 2023
याआधी गुरुवारी नॉर्वेजियन लेखक जॉन फॉस यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. जॉन फॉस यांना त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांसाठी आणि गद्यासाठी प्रदान करण्यात आले जे अकथनीय आवाज देतात. साहित्यातील नोबेल पारितोषिक स्वीडिश अकादमी, स्टॉकहोम, स्वीडन द्वारे प्रदान केले जाते. 2023 साठी नोबेल पारितोषिकाची रक्कम स्वीडिश क्रोनर (SEK) प्रति पूर्ण नोबेल पुरस्कार 11.0 दशलक्ष इतकी आहे.
[read_also content=”सिक्कीममध्ये पुराचा प्रकोप सुरूच; आतापर्यंत सात जवानांसह 21 जणांचा मृत्यू, 100 हून अधिक अद्याप बेपत्ता! https://www.navarashtra.com/india/21-died-including-seven-jawans-and-over-100-still-missing-in-assam-flood-so-far-nrps-466521/”]