Devendra Fadnavis News: 'अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही...; देवेंद्र फडणवीसांची भावनिक प्रतिक्रीया
Devendra Fadnavis on Ajit Pawar Death News: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी निधन झाले आहे. बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. लँडिंग दरम्यान विमान क्रॅश झाले आणि क्षणातच जमिवीवर कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा चुराडा झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. पवार कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राजकीय नेते, पवार कुटूंबीय, कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वजण बारामतीला रवाना झाले आहेत. अपघातस्थळी मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान या घटनेवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.
“आज सकाळी अतिशय दुखद घटना घडली. विमान अपघतात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली. महाराष्ट्रात शोककळा पसरली. अजितदादा पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्राची कानाकोपऱ्याची माहिती असलेला, राज्याच्या प्रश्नाची जाण असलेले नेते होते. अजित दादांबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अजित दादा संघर्षशील नेतृत्त्व होतं. सर्व परिस्थिती न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्रासठी आजचा दिवस कठीण आहे. अजितदादासारखे नेतृत्त्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. महाराष्ट्राच्या विकासात अजित पवार महत्त्वपूर्ण योगदान देत होते. त्यांचं असं जाणे मनाला चटका लावणारे आहे.
दमदार आणि दिलदार मित्र मला सोडून गेला. त्यांच्या कुटुंबावरही हा प्रचंड मोठा आघात आहे. एकनाथ शिंदे आणि मी बारामतीकडे निघणार आहोत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना याबाबत माहिती दिली आहे. त्यांनीही यावर खूप दुखं व्यक्त केलं आहे. पुढच्या सगळ्या गोष्टी परिवाराशी चर्चा करून ठरवण्यात येतील. सुप्रिया ताई आणि पार्थ पवार यांच्याशी बोलण झालं. बारामतीला पोहचल्यावर पुढचे सगळे निर्य़ण त्यांच्या संमतीने घेतले जातील. आज राज्यभरात शासकीय सुट्टी घोषित करत आहोत. तीन दिवसांचा दुखवटा जाहीर कऱण्यात आला आहे. पुढच्या सगळ्या बाबींची कल्पना लवकरच दिली जाईल. अजित पवारांच जाणं हे कधीही भरून न निघणारे नुकसान झालं. आम्ही इतक्या जवळून सोबत काम केलं आहे. खरं तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवायला मन तयार होत नाही. पुढच्या गोष्टी त्यांच्या कुटुंबियाशी बोलून ठरवल्या जातील. ”
१९९५ मध्ये अजित पवार पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हापासून ते या मतदारसंघातून सतत आमदार म्हणून निवडून येत आहेत. १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये ते विजयी झाले आहेत. त्यांनी केवळ राजकीय जीवनात स्वतःला स्थापित केले नाही तर स्वतःचा प्रभावही निर्माण केला आहे.
विमान अपघातात शरद पवार यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांचे काका शरद पवार दिल्लीहून बारामतीला रवाना झाले. सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह होत्या. देशभरातील राजकारणी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने बारामतीतील लोकांना खूप दुःख झाले आहे. घटनास्थळी मोठा जमाव जमला आहे.






