तुर्की (Turkey Earthquake) आणि सीरियामध्ये (Syria Earthquake) भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. या संकट काळात भारतासह जगभरातील अनेक देश तुर्की आणि सीरियाच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मात्र पाकिस्ताननं यात पुन्हा एकदा नाक खुपसलं आहे. पाकिस्तानने (Pakistan) हेकेखोरी दाखवत तुर्कीसाठी मदत घेऊन जाणाऱ्या भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे भारतीय विमानाला वळसा घालून तुर्कीमध्ये प्रवेश करावा लागला.(Pakistan Denied Airspace To Indian Aircraft)
भूकंपामुळे तुर्कीमधील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे 40 हून अधिक धक्के बसले. यामुळे तेथील हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली अडकून 4000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ढिगाऱ्याखाली अद्यापही अनेक जण अडकले असून बचावकार्य सुरु आहे. मात्र हवामान बदलामुळे यामध्ये अनेक अडथळे येत आहेत.
#TurkeyEarthquake | As per The Associated Press so far 4,600 people have been killed due to powerful earthquakes in Turkey & Syria. Death toll continues to rise amid widespread devastation. India has so far sent two rescue teams to earthquake-marred Turkey. — ANI (@ANI) February 7, 2023
तुर्कीचे भारतातील राजदूत यांनी तुर्कीला मदत केल्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत. फिरात सुनेलने या मदतीनंतर भारताविषयी म्हटले आहे की, ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र.’
[read_also content=”लोकलमध्ये चोरीचा प्रवाशांना आला संशय, दोन तरुणांना प्रवाशांनी घडवली अशी अद्दल, पाहा व्हिडिओ https://www.navarashtra.com/maharashtra/two-persons-beaten-in-csmt-badlapur-local-368018/”]
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तुर्कीला मदत पाठण्यासाठी एक बैठक झाली. यानंतर तुर्की सरकारच्या समन्वयाने भारतातून एनडीआरएफ, शोध आणि बचाव पथकांसह वैद्यकीय पथक तसेच मदत साहित्यसह तुर्कीसाठी रवाना करण्यात आलं.
पंतप्रधान कार्यालयाने निवेदनाद्वारे सांगितलं की, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) 100 कर्मचार्यांसह विशेष प्रशिक्षित श्वान पथके आणि आवश्यक उपकरणे असलेली दोन पथके भूकंपग्रस्त भागात शोध आणि बचाव कार्यासाठी पाठवण्यात आली आहेत. वैद्यकीय पथके प्रशिक्षित डॉक्टर तसेच अत्यावश्यक औषधांसह पॅरामेडिक्ससह मदतीसाठी तयार आहेत. तुर्की सरकार आणि अंकारा येथील भारतीय दूतावास आणि इस्तंबूलमधील वाणिज्य दूतावास कार्यालयाच्या समन्वयाने मदत तुर्कीमध्ये पाठवण्यात आली आहे.






