Pakistan Plane Crash : पाकिस्तानच्या हवाई दलाच्या विमानाचा भीषण अपघात; उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाला अन्...., VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित अपघातग्रस्त विमान प्रशिक्षण मोहिमेवर होते. उड्डाणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचे नियंत्रण सुटले आणि विमान थेट जमिनीवर जाऊन आदळले. यानंतर भीषण स्फोट झाला आणि परिसरात मोठी आग लागली. आग एवढी भयंकर होती की दोन्ही वैमानिकांचा जगीच मृत्यू झाला आहे. तर इतर तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयता उपचार सुरु आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मृत पायलटची ओळख कॅप्टन कासिम आणि कॅप्टन तल्हा अशा आहे.
ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर रहदारी सुरु आहे. याच वेळी अचानक एक विमान येऊन थेट जमिनीवर कोसळलते. यावेळी दोन दुचाकीस्वार येथून जात असतात. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. विमाना वेगाने खाली कोसळल्याने स्फोट होऊन आगीने पेट घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त विमान हे Super Mushashak MFI-17 ट्रेनर एअरक्राफ्ट होते. तांत्रिक बिघाडामुळे पायलट्सने विमान नागरीवस्तीपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. परंतु विमान नियंत्रणाबाहेर गेले होते. तसेच वैमानिकांनाही इजेक्ट होता आले नाही.
गेल्या काही महिन्यात पाकिस्तानात अनेक विमान दुर्घटना घडल्या आहे. जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत ही सर्वात मोठी पाचवी विमान दुर्घटना आहे. यापूर्वीही पाकिस्तानच्या अनेक लष्करी विमानांचा अपघात झाला आहे.
Just In : 2 Pakistan Airforce pilots lost their lives after a PAF aircraft crashed in the Sawaldher area of Katlang, Mardan , Pakistan. pic.twitter.com/bi7hScPtz1 — Baba Banaras™ (@RealBababanaras) June 15, 2026






