
Pakistan Betrys Trump
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) सरकारने इराणसाठी पाकिस्तान हद्दीतून ६ भूभार्ग गुपचूप खुले केले आहे. यामुळे इराणला थेट रशिया आणि चीनसारख्या देशांशी व्यापार करता येत आहे. हा ट्रम्प यांच्या इराणची समुद्रात नाकेबंदी करण्याच्या रणनीतीला मोठा धक्का मानला जात आहे.
ट्रम्प सरकारने इराणविरोधात मॅक्सिमम प्रेशर रणनीतीचा वापर केला आहे. होर्मुझ (Hormuz) सामुद्रधुनीत इराणच्या जहाजांची नाकेबंदी करुन आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. इराणचे केल आणि इतर व्यापारात अडथळा आणून इराणला नमतं करण्याची अमेरिकेची योजना आहे. मात्र पाकिस्तानने अमेरिकेच्या या योजनेवर पाणी फिरले आहे. पाकिस्तानने आपल्या हद्दीतून जोडले जाणारे ६ भूमार्ग इराणसाठी खुले केल्यामुळे ट्रम्प यांची योजना फसली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प सरकारसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. अमेरिकेला जवळचा मित्र म्हणवणारा पाकिस्तान(Pakistan) इराणला मदत करत आहे. हे मार्ग खुले केल्यामुळे इराण अमेरिकेच्या दबावाला जुमानणार नाही. पाकिस्तान अमेरिकेसोबत डबल गेम खेळत असल्याच आरोप तज्ज्ञांनी केला आहे.
पाकिस्तान इराण आणि अमेरिका (America) यांच्यातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा करत आहे. परंतु इराणने मात्र, त्याला मध्यस्थीसाठी अपात्र ठरवले आहे. पाकिस्तानची भूमिका निष्पक्ष नसल्याचे इराणने म्हटले आहे. तर इस्रायलनेही सुरुवातील पाकिस्तान अविश्वसनीय असल्याचा स्पष्ट केले आहे.याच वेळी अमेरिकेकडून मदत घेणार पाकिस्तान इराणला रसद पुरवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे अमेरिकेशी तणावपूर्ण संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे.
Trump admin, you have a problem. Your good friend Pakistan appears to have just opened six overland links to Iran, helping the regime bypass your counter-blockade in the Strait of Hormuz. This will help Iran continue to resist US pressure. Islamabad double deals America…AGAIN! pic.twitter.com/gbNZeuQy0G — Derek J. Grossman (@DerekJGrossman) April 29, 2026
Ans: पाकिस्तानने इराणला रशिया, चीन आणि इतर देशांशी व्यापार सुरु ठेवता यावा यासाठी आपल्या हद्दीतून जाणारे ६ मार्ग खुले केले आहे. ट्रम्प यांची नाकेबंदी असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे.
Ans: अमेरिकेच्या सुरक्षा तज्ज्ञांनी, पाकिस्तानने खुल्या केलेल्या मार्गांमुळे ट्रम्प यांच्या इराणवरील मॅक्सिमम प्रेश रणनीतिला कमकुवत केले आहे. पाकिस्तान दुहेरी खेळ खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Ans: इस्रायलने पाकिस्तानला अविश्वनीय देश म्हणून संबोधले आहे, तर इराणनेही पाकिस्तानच्या निष्पक्षतेवर संशय व्यक्त केला आहे. इराणच्या मते, पाकिस्तान अमेरिकेच्या हेतूसाठी कार्य करतो.