US Iran Conflict : भारतीय जहाजांचा होर्मुझमध्ये रस्ता रोखणार? इराणी राजदूतांनी स्पष्टचं सांगितलं; चाबरहारवर मोठे भाष्य (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इराणच्या राजदूतांनी चाबहार बंदर आणि भारतीय जहाजांची सुरक्षा आणि प्रादेशिक शांततेवर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने लावलेल्या निर्बंधामुळे भारत आणि इराणमधील धोरणात्मक संबंधावर कोणताही परिणाम झालेला नाही आणि होणार नाही असा विश्वास व्यक्त केला आहे.
मोहम्मद फतहाली यांनी म्हटले की, चाबहार प्रकल्प हा भारत, अफगाणिस्तान (Afghanistan) आणि मध्य आशियाला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या रेल्वे मार्गाचे ९० टक्के कामकाज पूर्ण झाले असून लवकरच हे बंदर राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कशी जोडले जाईल. हा प्रकल्प भारतासाठी जितका महत्त्वाचा आहे तितकाच इराणसाठीही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
होर्मुझ (Hormuz) सामुद्रुधीन आणि भारतीय जहाजांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली असताना राजदूतांनी मोठा दिलासा दिलासा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, इराण आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, सागरी सुरक्षेचे पालन करत आहे. ज्या देशांनी इराणविरोधी लष्करी कारवाईत सहभाग घेतलेला नाही अशा मित्र राष्ट्रांच्या जहाजांना कोणताही धोका नसल्याचे फतहाली यांनी स्पष्ट केले. भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
फतहाली यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या इराणबद्दल केलेल्या दाव्यांना फेटाळून लावले. त्यांनी म्हटले की, इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई (Mojtaba Khamenei) यांच्या प्रकृतीबाबतच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. त्यांना सुरक्षेचा कारणास्तव गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.त्यांनी म्हटले की, ट्रम्प यांचे दावे आणि वास्तवांमध्ये काहीही साम्य नाही. इराणने या संघर्षासाठी अनेक वर्षांपूर्वीच तयारी सुरु केली होती.इस्रायल आणि अमेरिकेचे सर्व दावे अफवाच आहेत.
Explainer : इराणशी युद्धात अमेरिकेची Exit रणनीती! विजयाची घोषणा करुन युद्धाचे मैदान सोडणार ट्रम्प?
Ans: भारतातील इराण राजदूतांनी स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेच्या निर्बंधानंतरही भारत-इराणच्या धोरणात्मक भागीदारीवर कोणताही परिणाम झालेला नाही. चाबहार प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून लवकरच हे बंदर राष्ट्रीय नेटवर्कशी जोडले जाईल असे त्यांनी सांगितले.
Ans: इराणचे भारतातील राजदूत मोहम्मद फतहाली यांनी स्पष्ट केले की, ज्या देशांनी इराणविरोधी लष्करी कारवाईत सहभाग घेतलेला नाही, अशा मित्र राष्ट्रांच्या जहाजांना कोणताही धोका नाही. भारताच्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्याची ग्वाही इराणने दिले आहे.






